चंद्रावरचं ‘विक्रम लँडर’चं ठिकाण सापडलं- इस्त्रो प्रमुख के. सिवान

हैदराबाद | चंद्राच्या पृष्ठभागापासून 2. 1 किमी अंतरावर असतानाच चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसोबतच सर्व भारतीयांचे चेहरे उतरले होते. मात्र, काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर चंद्रावरचे विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्त्रोला यश आले आहे, अशी माहिती इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी दिली आहे.

ऑर्बिटरने ‘विक्रम लँडर’चे फोटो काढले आहेत. यात ‘विक्रम लँडर’ची कुठल्याही प्रकारचं नुकसान झाालेलं नाही. त्याच्याशी संपर्क झालेला नाही. मात्र आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही सिवान यांनी यावेळी सांगितलं.

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायला केवळ काही मिनीटं उरली असताना इस्रोच्या नियंत्रण कक्षाचा ‘विक्रम लँडर’शी संपर्क तुटला होता. मात्र, संपर्क तुटला असला तरी पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल”, असं सिवान यांनी काल(शनिवार) स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रावर बरेच नवनवे शोध लागण्याची शक्यता आहे. आलेल्या या बातमीमुळे भारतीयांच्या आकांक्षा बळवल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-