इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांचा ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ पुरस्कारानं सन्मान

नवी दिल्ली : इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांना डॅा. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी तमिळनाडू सरकारने सिवन यांचा गौरव केला आहे. इस्त्रोने पाठवलेले ‘चांद्रयान-2’ दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. के. सिवन हे ‘चांद्रयान-2’ या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत.

के. सिवन यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण पदक आणि पाच लाख रोख रूपये असे आहे.तमिळनाडू सरकारच्यावतीने तमिळनाडूच्या रहिवासी व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 

जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा शेतात वडिलांना मदत करायचो. त्यामुळेच वडिलांनी माझं नाव घराजवळच्याच कॉलेजमध्ये घातलं. तसेच मी बीएससीला गणितात 100 गुण मिळवले. त्यावेळी माझं मन बदललं. मी कॉलेजला धोती घालून जात होतो. एमआयटीला प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच मी पँट घातली, असं के. सिवन यांनी सांगितलं. 

‘चांद्रयान-2’ मुळे प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 2 वाजून 21 मिनिटांनी यानाने यशस्वीपणे पृथ्वीची कक्षा सोडली आणि चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. इस्रोने ट्रान्स लूनर इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण केल. 

‘चांद्रयान-2’ हे पुढील सहा दिवस चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू ठेवणार आहे. जवळपास 4.1 लाख किलोमीटरचा प्रवास करून ते 20 ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल, अशी माहिती के. सिवन यांनी दिली आहे. 

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. सिवन येथे आले होते. ‘चांद्रयान-2’चे ‘ऑर्बिटर’, ‘लॅण्डर’ आणि ‘रोव्हर’ हे तिन्ही भाग सुस्थितीत असून सर्व यंत्रणा उत्तम प्रकारे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-मी बिकाऊ नाही; भाजपच्या ‘या’ महिला खासदाराचं पंतप्रधानांना ट्वीट

-अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपती घेणार भेट

-“भाजपचा फक्त जम्मू काश्मीरच्या जमिनीवर डोळा”

-तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाय मला; नाना पाटेकरांची पूरग्रस्तांना मदत

-कलम 370 रद्द झाल्यावर भाजपला ‘अच्छे दिन’; सदस्यांची संख्या झपाट्यानं वाढली