आयपीलमध्ये ‘या’ युवा खेळाडूनं अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकत रचला नवा विक्रम!

नवी दिल्ली | आयपीएलच्या 13व्या पर्वात अनेक खेळाडू आपल्या उत्तम खेळीचं प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे यावेळी अनेक क्रीडा रसिकही आयपीएल पाहण्यास जास्त उत्सुक दिसत आहेत. या पर्वात अनेक युवा खेळाडू क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंवर मात करताना दिसत आहेत.

रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे जलद गोलंदाज कगिसो रबाडा याने शानदार खेळ दाखवत संघासाठी विजयाची भूमिका पार पडली.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कगिसो रबाडा याने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच थक्क केले. याच गोलंदाजीच्या बळावर कगिसो रबाडा याने आयपीएलमध्ये एक नवा इतिहास रचला आहे.

एवढेच नाही तर दिल्ली कॅपिटल्स संघासाठी 50 बळी घेणारा कगीसो हा पहिलाच परदेशी गोलंदाज ठरला आहे. रबाडा याच्या गोलंदाजीवर सीएसकेचे डुप्लेसी हे खेळत होते, यातच त्याच्या चेंडूवर शिखर धवन यानं झेल घेतला. हाच रबाडा याचा ५० वा बळी ठरला.

कगिसो रबाडा याने सर्वात कमी सामन्यांमध्ये 50 बळी घेण्याचा पहिला विक्रम केला आहे. पण याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 50 बळी घेणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

आयपीएलमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 50 बळी घेण्याच्या बाबतीत रबाडा यानं सुनील नरेन यालाही मागे टाकलं आहे. सुनील नरेन याने 32 सामन्यांमध्ये 50 बळी घेतले होते आणि यात तो पहिल्या स्थानावर होता.

पण कगिसो रबाडा याने फक्त 27 सामन्यांमध्ये 50 बळी घेतले आहे. या यादीत जलद गोलंदाज लसिथ मलिंगा याने 33 सामन्यांमध्ये 50 बळी घेतले होते. इमरान ताहिर हा चौथ्या क्रमांकावर असून त्याने 35 सामन्यांमध्ये 50 बळी घेतले आहेत.

पाचव्या क्रमांकावरील मिचेल मॅकलेघन याने 36 सामन्यांमध्ये तर अमित मिश्रा याने 37 सामन्यांमध्ये 50 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर कगिसो रबाडा याने सर्वात कमी चेंडूत 50 बळी घेण्याच्या बाबतही पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

लसिथ मलिंगा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 749  चेंडूत 50 बळी घेतले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सुनील नरेन असून त्याने 50 बळी 760 चेंडूत घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय खेळाडूंनी रचला नवा विक्रम! आयपीएलच्या इतिहासात प्रथमच घडली ‘अशी’ गोष्ट

पायल घोष अनुरागनंतर आता ‘या’ बड्या खेळाडूवर गंभीर आरोप करत म्हणाली…

भाजपला मोठा धक्का! एकनाथ खडसे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता अंकिता लोखंडे विरुद्ध ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल होणार?

‘केबीसी’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट, जी पाहून अमिताभ बच्चन सुद्धा चकित झाले!