देश

भाजपच्या त्या आमदारावर कारवाई होणार; वडिलांचंही कारवाईला समर्थन

नवी दिल्ली : महापालिका अधिकाऱ्याला मारहाण करणारे भाजप आमदार आकाश विजयवर्गीयवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आकाशचे वडील आणि भाजपचे सरचिटणीस यांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.

पक्ष सर्वोच्च आहे आणि मोदी आमचे नेते आहेत. पक्षाने माझ्या मुलावर कारवाई करावी, असं कैलास विजयवर्गीय यांनी सांगितलं आहे.

पक्षाचा निर्णय कितीही कठोर असला तरी मी तो स्वीकारण्यास तयार आहे, मात्र मी हा वाद संपवू इच्छितो, असंही कैलास विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे भाजपच्या राज्य शाखेने आकाश विजयवर्गीय यांना नोटीस बजावली आहे. त्याच्या कृत्याबद्दल स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. त्यानंतर आकाश यांच्यावर कारवाई होऊ शकते, अशी माहिती आहे.

आकाश विजयवर्गीय यांनी इंदूर येथील महापालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केली होती. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. कुणाचाही पूत्र असो मात्र पक्षाला बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही, असं मोदी म्हणाले होते.

 

IMPIMP