खेळ

…म्हणून धोनीची आमच्या संघात खेळण्याची पात्रता नाही- केन विल्यमसन

मँचेस्टर | विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना चांगलाच चुरशीचा झाला. परंतू न्यूझीलंडने बाजी मारत भारताचा 18 धावांनी पराभव केला. भारताकडून खेळलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या आणि रविंद्र जाडेजा यांच्या खेळीचे कौतूक जगभरात झाले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने देखील धोनीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.

महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. धोनीची आमच्या संघात खेळण्याची पात्रता नाही, असे गौरवोद्गार न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने काढले आहेत.

महेंद्रसिंग धोनी जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्विकारत असेल तर आम्ही धोनीला न्यूझीलंड संघात येण्यासाठी नक्की विचारू, असं म्हणत त्याने धोनीच्या खेळाचे महत्व विषद केले आहे.

सेमी फायनलच्या लढतीत धोनी धावबाद होणं हे नशीबाचा भाग आहे आणि हाच आमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला, अशी प्रतिक्रिया त्याने सामना संपल्यानंतर दिली.

सेमिफायनलमध्ये भारतीय संघ अडचणीत आला असतानाही इतर खेळाडूंनी शेवटपर्यंत सामन्यात आपलं आव्हान कायम ठेवलं. यामुळेच भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघ आहे, असं विल्यमसनने म्हटलं आहे. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर त्याने अनेक क्रिकेट रसिकांची मनं जिंकली आहेत. 

भारत जगातील सर्वोत्कृष्ट संघ का आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे, अशा शब्दात विल्यमसनने भारतीय संघाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 

IMPIMP