औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेला काकासाहेब शिंदे सच्चा शिवसैनिक होता. वरील फोटोत त्याच्या हातातील शिवबंधन स्पष्टपणे दिसत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काकासाहेबने गोदावरी नदीत उडी मारुन जलसमाधी घेतली.
काकासाहेब मूळचा गंगाखेड तालुक्यातील कानडगावचा रहिवासी होता. मराठा क्रांती ठोक मोर्चात सहभागी होण्यासाठी तो औरंगाबादला आला होता. त्यावेळी जलसमाधी आंदोलनात सहभागी होत त्याने गोदावरी नदीत उडी घेतली.
गोदावरीच्या पात्रातून काकासाहेबला बाहेर काढण्यात आलं त्यावेळी तो अत्यवस्थ होता. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.