औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदेंचा गोदातीरी बसवला पुतळा!

औरंगाबाद | मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे पुलावरून गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली होती. यात काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला होता. गोदावरी नदीच्या पात्रात काकासाहेब शिंदेंचा पुतळा सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बसवण्यात आलाय.

काकासाहेब शिंदे या तरूणाने मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं. त्यांच्या याच कार्याचं स्मरण कायम रहावं, म्हणून स्थानिकांनी काकासाहेब यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतलाय.

याआधी काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केलेल्या कायगाव टोक येथील पुलाचं नामकरण हुतात्मा स्व. काकासाहेब दत्तात्रय शिंदे सेतू असं करण्यात आलं होतं. मराठा मोर्चेकऱ्यांच्या वतीने या पुलाचं नामकरण करण्यात आलं होतं.

दरम्यान, काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत असल्याने स्थानिकांनी त्यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…नाहीतर भाजपचाच काँग्रेस होईल; चंद्रकांत पाटलांचा काळजीचा सूर

-बीडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला झटका; हे दोन महत्वाचे नेते करणार वंचितमध्ये प्रवेश??

-राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना आता खावी लागणार जेलची हवा!

-राज ठाकरेंकडून काय धडा घेतला??? आदित्य ठाकरे म्हणतात…

-…अन् खासदार नवनीत राणांनी आपला पहिला पगार मुख्यमंत्र्यांना दिला!

IMPIMP