महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणला अखेर अटक!

भोपाळ | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवराळ भाषा वापरणारा कालीचरणला (kalicharan maharaj arrested) अखेर अटक करण्यात आली आहे.

कालीचरणने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या फाळणीसाठी बापूंनाही जबाबदार धरलं. कालीचरण याचं वादग्रस्त वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कालीचरणला रायपूर पोलिसांनी पहाटे साडेचार वाजता खजुराहो येथील हॉटेलमधून अटक केली. कालीचरण महाराजांना सायंकाळी 5 वाजेपर्यंत रस्त्याने रायपूरला आणता येईल.

कालीचरणला अटक करण्यासाठी छत्तीसगड पोलिसांनी अर्धा डझन पथके तयार केली होती. हे पथक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये कालीचरणच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकत होते.

कालीचरण महाराज हे खजुराहो येथील एका हॉटेलमध्ये असून त्यांनी मोबाईल बंद केल्याची माहिती पोलिसांना  मिळाली. त्यानंतर रायपूर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून कालीचरणला अटक केली.

काँग्रेसच नाही तर अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची केली होती. महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते आणि रायपूर महानगरपालिकेचे अध्यक्ष प्रमोद दुबे यांच्या तक्रारीनंतर कालीचरण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, कालीचरण बाबाच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. कालीचरण विरोधात अकोल्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलंय.

कालीचरण बाबाचा हा काही पहिलाच वाद नाही. याआधी कोरोनावरून संतापजनक वक्तव्य करत कालीचरणनं आरोग्य यंत्रणा, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा अपमान केला होता आणि आता गांधींबाबत हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना कधी संपणार?; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

‘कोरोनाची त्सुनामी येणार आणि…’; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं  

कोरोनाचा ‘या’ अवयवावर होतोय गंभीर परिणाम?; धक्कादायक माहिती समोर 

“माझ्यात आणि मोदींमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाली होती पण…” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट