मुंबई | राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे, असं वक्तव्य कालीचरण महाराजने केलं आहे.
कालीचरणने यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केलंय. तसेच, धर्मरक्षणासाठी शस्त्र हातात घेऊन हिंसक व्हायला हवं, असं गंभीर आव्हान देखील कालीचरणने केलं आहे.
राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करणे हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श घालून दिला आहे. आपण राष्ट्ररक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी शस्त्र उचललं पाहिजे, असंही कालीचरणने म्हटलंय.
गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण यांचे आदर्श धारण केले पाहिजेत. राष्ट्ररक्षणसााठी आपण हिंसक बनायला हवं. जशी आपली सेना आहे. याशिवाय उपाय नाही, असंही कालीचरण म्हणालेत.
दरम्यान, कालीचरणने याआधीही कोरोनावरून संतापजनक वक्तव्य केलं होतं. त्याने आरोग्य यंत्रणा, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा अपमान केला होता.
तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
दाऊद इब्राहिम गँगच्या टार्गेटवर कोण?; NIA च्या तपासातून धक्कादायक खुलासा
खासदाराचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!
‘आज मायेचं छत्र गमावलं’; बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन
पुतिन पुन्हा एकदा भडकले?; आता रशियाने ‘या’ देशाला धमकावलं
मोठी बातमी! नवाब मलिकांना सत्र न्यायालयाकडून दिलासा