महाराष्ट्र Top news सांगली

“कोरोना म्हणजे एक मोठं षढयंत्र, कोरोनाने मेले ते डॉक्टरांनीच मारले”

Kalicharan
Photo Credit- Facebook/ Kalicharan Maharaj

सांगली | कोरोना (Corona) म्हणजे फर्जीवाडा असल्याची मुक्ताफळे इथे उधळली. इतकेच काय कोरोनाचे मृत्यू म्हणजे डॉक्टरांनी लोकांना मारले. त्यांच्या किडनी आणि अवयवांची तस्करी केली, असा जावई शोध कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी लावला आहे.

कोरोना एक षडयंत्र आहे. तो फर्जीवाडा आहे इतकंच नाहीतर जागतिक आरोग्य संघटना पण फर्जीवाड आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ते सांगलीत बोलत होते.

करोना ही भयानक महामारी नाही. ज्या करोनामुळे लोकांचा मृत्यू (Death) झाला, त्या लोकांना डॉक्टरांनी मारलं आहे. त्यांच्या शरीरातील किडनी आणि मानवी अवयवांची तस्करी झाली आहे, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.

कालीचरण महाराज म्हणाले, भारतातील प्रजेने ईश्वरनिष्ठ होऊन आयुर्वेदाचे उपचार घ्यावेत. सगळे कोरोने-फिरोने फेल होतील. कशाकाय यांना भविष्यवाण्या सूचतात हो, असं ते म्हणालेत.

तिसरी लाट येऊन राह्यली आणि ही लाट येऊन राह्यली. त्यांच्या कंपन्या आहेत व्हॅक्सीनच्या. त्या तिसऱ्या लाटेच्या नावाखाली धडाधड व्हॅक्सीन बनवतात आणि त्या खपवतात. दुसरं काय हाय? हा कोरोना म्हणजे एक मोठे षढयंत्र आहे, असा दावा कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी केला आहे.

लोकांना मारणं सुरू आहे. त्यांचे मृतदेह लपेटून टाकून दिले जात आहेत. त्यांच्या किडन्या काढल्या, हार्ट काढले, डोळे काढले काय माहित. लोकांना मारून फेकत आहेत, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, ओमिक्रोननं पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली असताना ओमिक्रोनचा प्रसार अत्यंत वेगानं होत असल्याचं समोर आलंय. नव्यानं ओमिक्रोन आढळलेल्या देशाची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

आतापर्यंत जवळपास दीड डझन देशात ओमिक्रोनच्या नव्या विषाणुचा प्रसार झालाय. सुरूवातीला फक्त दक्षिण अफ्रिकेत आढळेला ओमिक्रोन आता 16 देशात आढळून आल्याची नवी यादी समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील दोन दिवस पाऊस झोडपून काढणार 

राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का; 25 वर्ष आमदार राहिलेला ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर 

Twitterचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांना आहे इतका पगार; आकडा ऐकून थक्क व्हाल

फक्त ‘या’ एका गोष्टीमुळं पतंगराव वसंतदादांच्या नजरेत भरले!, पुढं आयुष्य बदललं 

‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ’; ‘या’ शिवसेना नेत्याचा तटकरेंना टोला