ठरलं! येवल्यात छगन भुजबळांना टक्कर द्यायचा शिवसेनेचा प्लॅन तयार…

मुंबई |  येवला-लासलगाव मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. 5 वर्षानंतर पुन्हा कल्याणराव काळे शिवबंधनात अडकले आहेत.

‘मातोश्री’वर कल्याणराव काळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.  यावेळी नाशिक जिल्हाप्रमुख सुनील पाटील, संपर्क प्रमुख भाऊ चौधरी हे उपस्थित होते.

नाशिक स्थानिक स्वराज संस्थेचे विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे आणि नाशिक विभागीय शिक्षक विधानपरिषदेचे आमदार किशोर दराडे हे येवला येथील रहिवाशी आहेत. हे दोघे भाऊ शिवसेनेचे आमदार असल्याने शिवसेनेची असलेली ताकद त्यात कल्याणराव पाटलांनी प्रवेश केल्याने आणखी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर आता कडवे आव्हान उभे राहिलं आहे.

कल्याणराव पाटील हे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात 10 वर्ष आमदार होते. आता पुन्हा ते शिवसेनेत दाखल झाल्याने या मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

2004 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याणराव काळे यांनी छगन भुजबळ यांना जोरदार टक्क दिली होती. मात्र त्यांचा त्यावेळी पराभव झाला होता. 2014 मध्ये देखील भुजबळांविरोधात उमेदवारीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली होती म्हणून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, भुजबळांविरोधात शिवसेनेकडून कल्याणराव काळे, संभाजी पवार, रूपचंद भागवत यांच्यात उमेदवारीसाठी चुरस असेल.

महत्वाच्या बातम्या-

-“विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ होईल”

-शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का??; मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राष्ट्रवादी!

-मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही- राज ठाकरे

-“220 जागा जिंकण्याचा विश्वास आहे तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक लढायला का घाबरता??”

-“भाजप-सेनेची यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी मात्र राष्ट्रवादीची रयतेच्या बुलंद आवाजासाठी”