आर्मीवर अविश्वास दाखवू नका म्हणण्यापेक्षा….; कमल हसन यांचं मोदींवर टीकास्त्र

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदीजी, भारत चीन सीमेवर जे घडलं ते सत्य भारत देशाला सांगा. तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळणं बदं करा तसंच लोकांना भावनिकरित्या हाताळणं बंद करा. आपण आर्मीवर अविश्वास दाखवू नका म्हणण्यापेक्षा लोकांना सत्य सांगितलं तर फार बरं होईल, अशी टीका अभिनेता कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही किंबहुना लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. यानंतर विविध माध्यमातून मोदींवर टीका होऊ लागली. केंद्र सरकारकडून मग पंतप्रधानांच्या वक्तव्याचा विपर्यास लावला जात आहे, असं सांगण्यात आलं. या सगळ्या प्रकरणी कमल हसन यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.

प्रश्न विचारणं देशविरोधी होत नाही. आपल्या घटनेने प्रश्न विचारण्याचा हक्क दिला आहे आणि जोपर्यंत सत्य ऐकायला मिळत नाही आम्ही प्रश्न विचारत राहणार, असंही कमल हसन यांनी मोदींना ठणकावून सांगितलं आहे.

संपूर्ण माहिती देऊ शकत नाही हे समजू शकतो, पण देशाला अशा प्रकारच्या संवेदनशील घटनांची माहिती दिली पाहिजे. आपल्या लष्करावर अविश्वास दाखवू नका किंवा देशविरोधी होऊ नका असं म्हणण्यापेक्षा योग्य माहिती दिलं तर जास्त चांगलं होईल, असं हसन म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-MPSC निकालात मराठा समाजातील मुलांची संख्या बघून समाधान आणि आनंद वाटला- छत्रपती संभाजीराजे

-‘या’ कारणाने सुशांतला ते ३ सिनेमे करता आले नाहीत, पोलिसांचा वेगात तपास सुरु

-जागतिक आरोग्य संघटनेचा दिलाय हा इशारा; जग आता मोठ्या संकटात!

-3 वर्षे कॉलिंगसाठी साधा मोबाईल वापरला; अडीच वर्षात क्रॅक केल्या 4 स्पर्धा परीक्षा!

-वारीच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसंदर्भात राज्य सरकारची मोठी घोषणा