देश

आरक्षणासंदर्भात मध्यप्रदेश सरकारची सगळ्यात मोठी घोषणा!

भोपाळ | खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये राज्यातल्या तरूणांना तब्बल 70 टक्के आरक्षण देण्याबाबत मध्यप्रदेश सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. तसा अध्यादेश मध्यप्रदेश सरकार काढण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात मध्य प्रदेश विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ही माहिती दिली आहे.

मंदसौरचे आमदार यशपाल सिंह यांनी विधानसभेत बेरोजगारी बाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावरून काँग्रेस आणि भाजपच्या आमदारंमध्ये वादही झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी खासगी क्षेत्राातल्या आरक्षणाची घोषणा केली.

आरक्षणाच्या नावाखाली सरकार राज्यातल्या तरूणांची फसवणूक करत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे.

मध्यप्रदेशमध्ये बाहेरच्या राज्यातून कामासाठी येणाऱ्यांची गोची होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे भुमीपुत्रांना दिलासा मिळाला आहे.  दरम्यान, भूमीपुत्रांना नोकरीत 70 टक्के आरक्षण देणारं मध्य प्रदेश हे देशातलं पहिलं राज्य असेल.

IMPIMP