मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वा.दग्रस्त विधानांमुळं चांगलीच चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर कंगनानं बॉलिवूड मधील नेपोटीजम, मुव्ही माफिया यांच्यासह काही राजकीय नेत्यांवरही टी.का करत वा.दग्रस्त विधानं केली आहेत. यामुळे अनेकांनी कंगनाविरुद्ध संता.प व्यक्त केला आहे. मात्र, आता कंगनानं कृषी विधेयकासंबंधित केलेल्या एका ट्विटमुळं शेतकऱ्यांनी थेट कंगनाविरुद्ध गु.न्हा दाखल केला आहे.
केंद्र सरकारनं नुकतीच तीन कृषी विधेयकं सादर केली आहेत. केंद्र सरकारनं सादर केलेली विधेयक शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहेत, असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे देशातील अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर कंगनानं एक ट्विट केलं होतं. हे ट्विट शेतकऱ्यांचं अ.पमान करणारं आहे, असं म्हणत कंगना राणावत विरुद्ध कर्नाटकच्या तुमकुरच्या एका न्यायालयात फौ.जदारी गु.न्हा दाखल करण्यात आला आहे.
कंगना राणावतनं कृषी बिलाचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा ट्विट करून अ.पमान केला आहे, असं कंगना विरुद्ध दाखल केलेल्या के.समध्ये म्हटलं आहे. कंगनाच्या या ट्विटनंतर देशभरातील बरेच शेतकरी प्रचंड सं.तापले होते. काही शेतकऱ्यांनी कंगना विरुद्ध निदर्शने सुद्धा केली आहेत. मात्र, देशात शेतकऱ्यांचा वाढता सं.ताप पाहून कंगनानं आपण शेतकऱ्यांचा अ.पमान केला नसल्याचं स्पष्ट केलं.
केंद्र सरकारनं नव्यानं सादर केलेली ही विधेयक बाजार व्यवस्था नष्ट करतील आणि किमान आधारभूत किंमत प्रणाली नष्ट होईल. शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकाला यामुळे काहीच भाव मिळणार नाही आणि व्यापारी कवडीमोल किंमतीनं शेतकऱ्यांचं उत्पादन विकत घेतील, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत.
या कृषी विधेयकांवरून राज्यसभेत प्रचंड गों.धळ उडाला होता. विरोधी पक्ष नेत्यांनी या विधेयकांवरून राज्यसभेतील माईक तोडले, कागदपत्रे फाडत ध.क्काबु.क्की केली, असं अभूतपूर्व नाट्य राज्यसभेत यावेळी घडलं होतं. मात्र, राज्यसभेत विरोधकांना न जुमानता सरकारनं प्रचंड गों.धळात हे विधेयक मंजूर करून घेतलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारनं नव्यानं सादर केलेल्या कृषी विधेयकाविरोधात अनेक शेतकरी संघटनांची देशभरात निदर्शने चालू आहेत. 25 सप्टेंबरला देशातील शेतकऱ्यांनी आणि काही राजकीय पक्षांनी भारत बंद ठेवला होता. देशातील बऱ्याच शेतकऱ्यांनी भारत बंदला प्रतिसाद दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
त्यांनी मला सांगितलं, २००% ही ह त्या आहे… सुशांतच्या वकिलाचा धक्कादायक दावा
काही लोकांनी अलका कुबल यांना श्रद्धांजली वाहिली; त्यावर अलका कुबल म्हणतात…
सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! चौकशी दरम्यान सारा अली खाननं केला मोठा खुलासा म्हणाली…
“शरद पवार पाठीमागच्या बाजूने भाजपला सपोर्ट करत आहेत”
करण जोहर पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, “माझा त्या प्रकाराशी काहीही संबंध नाही”