“शेतकऱ्यांना दह.शतवादी म्हणणारी झाशीची राणी शेफारली आहे, कंगनानं आणि भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर आपल्या वा.दग्रस्त विधानांमुळ अभिनेत्री कंगना रानौत चांगलीच चर्चेत आहे. कंगनानं बॉलीवूड इंडस्ट्री मधील वा.ईट गोष्टींविरुद्ध जणू बंडच पुकारलं आहे. तसेच कंगनानं राज्यातील अनेक मंत्र्यांवरही सडकून टी.का केल्या आहेत. अशातच आता कंगनानं पुन्हा एकदा वा.दग्रस्त विधान करत देशातील शेतकऱ्यांवर निशाणा साधला आहे. यामुळे कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनावर तोफ डागलली आहे.

देशातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केलं होतं. हेच ट्वीट रिट्वीट करत कंगनानं शेतकऱ्यांनावर टि.का केली आहे. ‘पंतप्रधानजी जे लोक झोपले आहेत त्यांना जागं करता येईल. ज्यांचा गै.रसमज झाला आहे त्यांना समजवता येईल. मात्र, जो न समजण्याची अॅक्टिंग करत असेल जो झोपण्याची नाटकं करत असेल तर त्याला कितीही जागवून किंवा समजावून काहीच उपयोग नाही. हे तेच दह.शतवादी लोक आहेत ज्यांनी सीएएला विरोध करत र.क्ताचे पाठ वाहिले होते. प्रत्यक्षात मात्र सीएए कायद्यामुळे एकाही व्यक्तीच नागरिकत्व हिरावून घेतलं गलं नव्हतं,’ असं ट्वीट कंगनानं केलं आहे.

कंगनाच्या याच ट्वीटवर उत्तर देताना कंगनानं शेतकऱ्यांना दह.शतवादी म्हणल्याचा आरो.प कॉंग्रेसनं केला आहे. कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंबंधित एक ट्वीट केलं आहे. ‘आता कंगना रानौत देशातील शेतकऱ्यांना आ.तंक.वादी म्हणाली आहे. कंगनानं केलेल्या या वक्तव्यामुळं मोदी सरकारनं आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितलीच पाहिजे,’ अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

तसेच मोदी सरकारनं कंगना रानौतला दिलेल्या वाय प्लस सुरक्षा आणि पाठींब्यामुळेच ही झाशीची राणी एवढी शे.फारली आहे. आम्ही भाजप व कंगना रानौत दोघांचा जाहीर नि.षेध करत आहोत, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक विधेयकावरून शेतकऱ्यांना आश्वस्त करणारं एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी यांनी एमएसपी व्यवस्था या पुढेही चालू राहणार असल्याचं सांगितलं आहे.

तसेच शेतीमालाची खरेदी केंद्र सरकार करणार आहे. आम्ही येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. शेतकऱ्यांच्या साह्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, असं नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. कंगना रानौतनं नरेंद्र मोदी यांचं हेच ट्वीट रिट्वीट करत शेतकऱ्यांची तुलना दह.शतवाद्यांबर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“अनुरागनं मला त्यावेळी अडल्ट फिल्म दाखवली अन् माझ्यासमोर कपडे काढत मलाही…”

‘अनेक हिरोंनी माझ्यासोबतही…’; कंगनानं सांगितली चित्रपट सृष्टीची काळी बाजू

‘सुशांतला ‘या’ कारणानं रिया चक्रवर्तीची भीती वाटत होती’; सिद्धार्थनं केला धक्कादायक खुलासा!

सुशांतची शेवटची इंस्टाग्राम स्टोरी होती दिशा सॅलियन संबंधित, पाहा काय बोलला होता सुशांत

चित्रपट सृष्टीत पुन्हा खळबळ! ‘या’ अभिनेत्रीनं केला बड्या दिग्दर्शकावर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप