आता कंगणा राणावत नव्या वादात; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बंगळुरु | मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारसोबत पंगा घेतल्यानंतर वादात सापडलेली अभिनेत्री कंगणा राणावत आता पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी कर्नाटकातील एका न्यायालयाने तिच्याविरुद्ध एफ.आय.आर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

कर्नाटकातील तुमकुर न्यायालयाने कंगणा राणावतविरोधात एफ.आय.आर दाखल करण्याचे आदेश क्यथसांद्रा पोलीस स्टेशनला दिले आहेत. रमेश नाईल एल यांनी कंगणा राणावत विरोधात त.क्रार दाखल केली होती.

कंगणा राणावतने शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे. कृषि सुधारणा विधेयकं संसदेत मंजुरीसाठी मांडल्यानंतर देशभरात शेतकऱ्यांचा आक्रोश पहायला मिळाला होता.

शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं होतं. कृषि विधेयकांसंदर्भात शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या ट्विटवर कंगणा राणावतनं एक ट्विट केलं होतं.

”पंतप्रधानजी, झोपी गेलेल्याला जागं केलं जाऊ शकतं. गैरसमज असणाऱ्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र ज्यानं झोपेचं सोंग घेतलेलं आहे, ज्याला समजूनचं घ्यायचं नाही त्या समजावता येऊ शकतं का?, असं कंगणानं म्हटलं होतं.

दरम्यान, तिच्या या वाक्यांवर आक्षेप घेण्यासारखं काही नव्हतं. मात्र त्यानंतर कंगणाने वापरलेले शब्द तिच्यावर हा गु.न्हा दाखल होण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. ये वही आ.तंकी हैं CAA से एक भी इंसान की सिटिज़ेन्शिप नहीं गयी मगर इन्होंने ख़ू.न की नदियां बहा दी, असं तिनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कंगणा राणावतला आपल्या या ट्विटमुळे मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र 21 सप्टेंबर रोजी कंगणानं यावर स्पष्टीकरण दिलं होतं. काय म्हटलं होतं तीने या स्पष्टीकरणात जाणून घ्या…

”जैसे श्री. कृष्ण की नारायणी सेना थी… वैसे ही पप्पु की भी अपनी एक चंपू सेना है, जो की सिर्फ़ अ.फ़वाहों के दम पे लड़ना जानती है, यह है मेरा ऑरिजिनल ट्वीट अगर कोई यह सिद्ध करदे की मैंने किसानों को आ.तंकी कहा, मैं माफ़ी मांगकर हमेशा केलिए ट्वीटर छोड़ दूँगी, असं तीनं या आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

रंगीन ख्रिस गेल… क्रिकेटसोबतच ‘या’ गोष्टीचाही लुटतोय मनमुराद आनंद!

बाप मजूर, आई चालवते दुकान; खेळायला मिळत नव्हता साधा बॉल, बनला याॅर्कर किंग!

वडील चर्मकार, आई करते मजुरी; मराठी मुलानं उभारलं असं साम्राज्य, आता करोडोची उलाढाल!

आई-वडिलांनी भाजीपाला विकून शिकवलं, पोरीनं साऱ्या राज्यात त्यांचं नाव करुन दाखवलं!

सोशल मीडियावरील एका व्हिडीओचा चमत्कार; रडणारा बाबा हसू लागला!