हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का- कंगना राणौत

अभिनेत्री कंगना राणौतची शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य सुरुच आहे. शेतकरी आंदोलनावर भारतीय खेळाडूंनी दिलेल्या प्रतिक्रियांवर तिने आता क्रिकेटर्सवर देखील आपला निशाणा साधला आहे. कंगनानं क्रिकेटपटू रोहित शर्माच्या ट्विटरवरुन क्रिकेट खेळाडूंवर निशाणा साधला आहे.

‘हे सर्व क्रिकेटर खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत?’, अशी टिका कंगनानं केली आहे. कंगनानं रोहित शर्माच्या ट्विटला रिप्लाय करत ही टिका केला आहे.

याचसोबत कंगणानं शेतकरी आंदोलनावर अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलंलं पाहायला मिळालं. ते दहशतवादी आहेत त्यांच्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांची भीती वाटते हे सांगून टाका, असं आव्हान कंगनानं क्रिकेट्रर्सना केलेलं पाहायला मिळांलं.

rohit tweet

दिल्लीच्या सीमेवर मागच्या दोन महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाला आता देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. यातच गायिका रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत भडकली आहे.

रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली आणि लिहिले की, “आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे.” रिहानाला पलटवार करत कंगनाने ट्वीट केले की, “या प्रकरणावर कोणीही बोलत नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहेत, ज्यांना भारताची विभागणी करायची आहे. जेणेकरुन चीन आपल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवेल. शांत बसून राहा. आमचा देश विकायला आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही.”

महत्वाच्या बातम्या –

लग्नानंतर ‘या’ कारणामुळे नताशा झाली ट्रोल

जाणून घ्या सकाळी लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

“जनमताचा नाही ठिकाणा आणि मला मुख्यमंत्री म्हणा”

‘बिग बॉस’च्या ‘या’ माजी स्पर्धकाचं दुःखद निधन

नवऱ्यासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून महिलेनं उचललं अत्यंत धक्कादायक पाऊल!