मास्क न घातलेल्या कंगना रणौतला ‘या’ अभिनेत्यानं सुनावले खडेबोल, म्हणाला…

मुंबई| बाॅलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य, बेधडक बोलणं, यामुळे चर्चेचा विषय बनत असते. यातच कंगना आता एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने लोकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावा. तसेच सुरक्षित अंतर ठेवावे असे सरकार सांगत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या लोकांकडून दंड वसूल केला जात आहे. पण असे असले तरी लोक मास्क न घालता फिरताना दिसत आहे.

करोनाच्या काळात सुरक्षित राहा सांगणारी कंगना आता मास्क न घालता बाहेर जाताना दिसत आहे. यामुळे कंगना पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.

कंगनाला नुकतेच मुंबईतील एका स्टुडिओच्या बाहेर विनामास्क पाहाण्यात आले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती गाडीतून बाहेर पडताना दिसत आहे. सुरुवातीला तिने फोटोग्राफर्सना पोझ देण्यास नकार दिला. पण नंतर ती पोझ देऊन फोटो काढताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

तिचा हा व्हिडीओ पाहून अभिनेता सुयश रायने यावर कमेंट केली आहे. अभिनेता सुयश राय म्हणाला, “जगाला ज्ञान द्यायचं असतं तर सगळ्या पुढे असतात, मुर्ख लोक अशी असतात”, अशी कमेंट करत त्याने कंगनाला ट्रोल केलं आहे.

तर त्याची पत्नी आणि अभिनेत्री किश्वर मर्चंटने देखील कंगनाला ट्रोल केलं आहे. ती म्हणाली, “ती कधीच मास्क परिधान करत नाही, एवढंच काय तर तिच्या हातात सुद्धा मास्क नाही. हे कसं शक्य आहे?” अनेक नेटकऱ्यांनी असेच प्रश्न विचारत कंगनाला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, कंगनाच्या कामाविषयी बोलायं झालं तर कंगना लवकरच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

थलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेत्या असा 30 वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये जयललिता यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांनी मिळवलेलं यश चित्रीत करण्यात आलं आहे. हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधून जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाच्या बातम्या – 

उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खाणं टाळा, नाहीतर होऊ…

पुन्हा एकदा ऐकू येणार ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हा’…

राशीभविष्य: आज ‘या’ राशींच्या लोकांसाठी आहे…

जाणून घ्या! गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार ‘हे’…

फँड्रीतील शालूच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा…