Top news देश

राणी लक्ष्मीबाईंच्या पावलावर चालतेय, ना वाकणार, ना घाबरणार; कंगणा निघाली मुंबईला!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रानौत चांगलीच चर्चेत आहे. कंगना रानौतनं मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीर सारखं वाटत असल्याचं वक्तव्य केलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यामुळे सध्या चांगलाच वाद चालू आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळं शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी कंगनावर टिका केली होती. मात्र, कंगना रानौत आज मुंबईला येण्यासाठी निघाली आहे. मुंबईला निघण्यापूर्वी कंगनानं काही ट्वीट केले आहेत.

‘मी चित्रपटाद्वारे राणी लक्ष्मीबाईंचे धैर्य, पराक्रम आणि त्याग जगला आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे मला स्वतःच्या महाराष्ट्रात येण्यापासून रोखले जात आहे. मी चुकीच्या विरोधात आवाज उठवतच राहीन,’ असं कंगनानं ट्विटरवर म्हटलं आहे.

तसेच ‘वयाच्या बाराव्या वर्षी मी हिमाचल सोडले आणि चंदिगढच्या वसतिगृहात गेले. त्यानंतर दिल्लीत राहिले आणि जेव्हा मी सोळा वर्षांची होते तेव्हा मुंबईला आले. काही मित्र म्हणाले की मुंबईमध्ये तोच राहतो, ज्याच्यावर मुंबादेवीची इच्छा असेल. यामुळे आम्ही सर्वजण मुंबादेवीचं दर्शन करायला गेलो. माझे सर्व मित्र मुंबई सोडून गेले. माला मात्र मुंबादेवीनं तिच्यापासून ठेवून घेतलं,’ असंही कंगनानं म्हटलं आहे.

कंगना आज सकाळी मंडीवरून चंदिगढला रवाना झाली आहे. कंगना विमानानं प्रवास करत चंदिगढवरून मुंबईला येणार आहे. कंगनानं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की तिला कोणी कितीही रोखलं तरी ती मुंबईला येणार आणि आज कंगना प्रत्यक्षात मुंबईला येण्यासाठी निघाली आहे.

दरम्यान, मुंबई मातेचा अपमान करणाऱ्यांची नवे इतिहासात डांबरानं लिहिली जातील. बेईमान लोकांनी राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये, असं शिवसेनेनं समानाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

ड्रग्ज घेतल्याच्या संशयावरून कंगना रानौतची पोलीस चौकशी कर्ली जाणार आहे, असं मंगळवारी राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसेच मुंबई महापालिकेनं कंगनाच्या बंगल्याबाहेर एक नोटीस चिकटवली आहे. तसेच कंगनाच्या परवानगीशिवाय बंगल्यात भरपूर बदल करण्यात आले आहेत, असं नोटीसवर लिहिण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“केंद्र सरकार राज्याला कर्जाच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न करत आहे”

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली आहे”

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! अखेर सुशांतची ‘ही’ गर्लफ्रेंड गजाआड; इतर दिग्गजही अडकणार जाळ्यात?

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाला नाट्यमय वळण; सुशांतच्या घरातील ‘या’ व्यक्तिविरोधात तक्रार

पुण्यात लग्नात जेवताना ‘ही’ गोष्ट करण्यास मनाई; जाणून घ्या सर्व नव्या अटी!