ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगणा राणावतचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

नवी दिल्ली | देशात ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरु आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. आता यावर बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतनं भाष्य केलं आहे.

कंगना धाकडच्या प्रमोशनसाठी वाराणसीला गेली होती. यावेळी तिला मीडियाच्या काही लोकांनी प्रश्न विचारले. यावेळी बोलताना तिने मोठं वक्तव्य केलं आहे.

जसं मथुरेच्या कणाकणात कृष्ण आहे तसं अयोध्येच्या कणाकणात राम आहे, त्याचप्रमाणे काशीच्या कणाकणात शिव आहे. असं कंगणानं म्हटलं आहे.

दरम्यान, आगामी धाकड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. यावेळी कंगना वाराणसीला गेली होती.

कंगणासोबत अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता कलाकारही होते. वाराणसीला काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर तिनं प्रतिक्रिया दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका 

“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली” 

“पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल”  

“इकडे मशिदी खोदण्यापेक्षा, चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर मिळवून दाखवा” 

“कुठेही दगड ठेवा अन् त्याला लाल रंग लावा, लगेच मंदिर तयार होतं”