कंगना राणौतला ट्विटरचा झटका, केली ‘ही’ कारवाई

अभिनेत्री कंगना राणौतची शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य सुरुच आहे. तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला ट्विटरकडून चेतावणी देण्यात आली होती. मात्र तरीही कंगनानं क्रिकेटपटूंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं तिच्या  ट्विटरवर कारवाई करण्यात आहे.

सामाजिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही ट्विट न करण्याची चेतावणी ट्विटरकडून कंगनाला देण्यात आली होती. तरीही गुरुवारी तिनं शेतकरी आंदोलनावरून वादग्रस्त ट्विट केलेच. तिनं ट्विटमध्ये क्रिकेटपटूंविषयी वादग्रस्त शब्द वापरले. त्यामुळे ट्विटरने तिच्या दोन पोस्ट डिलीट केल्या.

ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही लागू केलेल्या पॉलिसीच्या श्रेणीनुसार ट्विटर नियमांचे उल्लंघन करणार्‍या ट्विटवर कारवाई केली आहे.

रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली आणि लिहिले की, “आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे.” रिहानाला पलटवार करत कंगनाने ट्वीट केले की, “या प्रकरणावर कोणीही बोलत नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहेत, ज्यांना भारताची विभागणी करायची आहे. जेणेकरुन चीन आपल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवेल. शांत बसून राहा. आमचा देश विकायला आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही.”

‘हे सर्व क्रिकेटर खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत?’, अशी टिका कंगनानं केली होती. कंगनानं रोहित शर्माच्या ट्विटला रिप्लाय करत ही टिका केली होती. मात्र आता हे ट्विट ट्विटरवरुन हटवण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का- कंगना राणौत

लग्नानंतर ‘या’ कारणामुळे नताशा झाली ट्रोल

जाणून घ्या सकाळी लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

“जनमताचा नाही ठिकाणा आणि मला मुख्यमंत्री म्हणा”

‘बिग बॉस’च्या ‘या’ माजी स्पर्धकाचं दुःखद निधन