कंगना पुन्हा बरळली! ‘या’ बड्या क्रिकेटपटूला गंभीर सवाल करत म्हणाली…

मुंबई | कंगना राणावत अलीकडे खूप चर्चेच आहे. ती सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. ती नेहमी ट्विट करत काही न काही बरळत असते. कंगना राणावत सोशल मीडियावर आपले मत शेअर करत असते. कंगना राणावत काही बोलली आणि वा.द झाला नाही असं क्वचितच घडत असेल. आता कंगनाने बंगलादेशी  क्रिकेटपटू शाकिब-अल-हसनच्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

16 नोव्हेंबरला ऑलराऊंडर क्रिकेटर शाकिब अल हसन काली पूजा करण्यासाठी कोलकत्ता येथे दाखल झाला होता. या पूजेनंतर सोशल मीडियावर त्याला जीवे मा.रण्याची ध.मकी देण्यात आली होती.

काली पूजाचे फेसबुक लाइव्ह शाकिब अल हसन याने केले आणि यावेळी एका व्यक्तीने त्याला शि.वीगाळ केली. तसेच त्या व्यक्तीने शाकिबला ठा.र मा.रण्याची ध.मकी दिली.

मुस्लिम कट्टरपंथियांनी शाकीबला जीवे मा.रण्याची ध.मकी दिल्यानंतर शाकिब अल हसनने माफी मागितली. या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना ट्विट करत म्हणाली की, मंदिरात जाण्यापासून तुम्ही का घाबरता? काही तरी कारण असेलच. मी संपूर्ण आयुष्य जरी मशिदीत राहिले तरी मुखातून राम नाम जाणार नाही. स्वतःच्या श्रद्धेवर विश्वास नाही का? तसेच हिंदूचा भूतकाळ तुम्हाला मंदिरांमधून आकर्षित करतो? स्व:तालाच विचारा.

त्यांच्याजवळ तुझ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. ते तुझं घर तोडतील. तुला का.रागृहात टाकतील. हे योग्य नाही. जॅक, ट्विटर आणि ट्विटर इंडिया पक्षपात करतात. एक वेगळाच प्रोपेगेंडा चालवतात. जे अतिशय निराशाजनक आहे, असंही कंगनाने ट्वीट करत म्हटलं आहे. कंगनाचं हे ट्वीट प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे. तिच्या या ट्वीटनंतर अनेक लोक कंगनाला सवाल करत आहेत.

दरम्यान, कंगनाची वक्तव्य तिला चांगलीच अंगलट येत आहेत. कंगना रानावातनं काही दिवसांपूर्वी धार्मिक तेढ पसरवनारं वक्तव्य केलं होतं. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मुस्लीम समाजाचं प्राबल्य आहे. मी झाशीची राणी हा चित्रपट बनवून इंडस्ट्रीतील मुस्लीम प्राबल्य मोडून काढलं, असं कंगना काही दिवसांपूर्वी बरळली होती. कंगनाच्या याच वक्तव्याविरोधात वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

कंगना राणावत हिंदू मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवण्याचं काम करत आहे. कंगना धर्मावरून अनेकवेळा वा.दग्रस्त आणि आक्षेपार्ह्य ट्वीट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला होता. यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कंगनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर मुंबई पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी दोनवेळा समन्स बजावला होता. मात्र, कंगना दोन्हीवेळी चौकशीसाठी हजर झाली नाही. कंगनाला आता मुंबई पोलिसांनी तिसऱ्यावेळी समन्स बजावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अभिनेत्री पूनम पांडे गरोदर असल्याचं ते वृत्त खोटं? पूनम स्वतः म्हणाली…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ व्यवसायाबद्दल किरीट सोमय्या यांचा धक्कादायक गौप्यस्फोट!

धक्कादायक! ‘सुशांत प्रकरणामागे अक्षय कुमार देखील आहे?’

धक्कादायक! ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याने चित्रपट सृष्टीला केलं अलविदा

नेहा कक्करने शेअर केला हनिमूनचा ‘तो’ फोटो, चाहत्यांनीही दिलं भरभरून प्रेम