Top news देश राजकारण

बिहार निवडणुकीत कंगना भाजपची स्टार प्रचारक होणार? फडणवीसांनी दिल उत्तर म्हणाले…

बोधगया | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रानौत चांगलीच चर्चेत आहे. कंगनानं नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ अनेकवेळा वक्तव्य केल्यानं कंगना रानौत भाजपमध्ये प्रवेश करणार का?, असा प्रश्न अनेकवेळा कंगनाला विचारला गेला होता. मात्र, कंगनानं आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं होतं.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंगनाविषयी पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आला होता. येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत कंगना स्टार प्रचारकांपैकी एक असेल का?, असा प्रश्न बोधगया येथे पत्रकारांनी फडणवीसांना विचारला होता.

यावेळी फडणीसांनी पत्रकारांनी वर्तवलेली ही शक्यता फेटाळली आहे. भाजपजवळ स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ते फार मोठे स्टार प्रचारक आहेत. ते असताना दुसऱ्या स्टार प्रचारकाची गरज नाही, असं फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रानौत आणि शिवसेना नेत्यांमध्ये वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवरही देवेंद्र फडणवीस यांनी बोधगया येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगनाशी लढण्यात वेळ घालवण्यापेक्षा कोरोनाशी लढाई करावी, असा सल्ला फडणवीस यांनी यावेळी ठाकरेंना दिला आहे.

दरम्यान, कंगनानं मुंबईची तुलना पाकबरोबर केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कंगनावर तोफ डागलली होती. यानंतर कंगना रानौत आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगली आहे. कंगनाला मुंबईत धोका असल्याचं सांगत कंगना मुंबईत पाच दिवसांपूर्वी दाखल झाली तेव्हा केंद्र सरकारकडून कंगनाला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती.

मुंबईत पाच दिवस राहिल्यानंतर सोमवारी सकाळी कंगना मनालीला परत गेली आहे. तसेच कंगनाच मुंबईतील ऑफिस अवैध असल्याचं सांगत बीएमसीनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. कंगनानं ही कारवाई अवैध असल्याचं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझे हजारो स्त्रियांशी शारिरीक संबंध असतील पण…’; सलमाननं त्यावेळी केले होते अनेक खुलासे, वाचा सविस्तर

रिया आणि सुशांतचं ‘ते’ कृत्य व्हिडीओमधून आलं समोर; पाहा रिया आणि सुशांतचा अनसीन व्हिडीओ

सुशांत प्रकरणी रियाचा धक्कादायक खुलासा! ‘या’ व्यक्तीनं सुशांतला गां.जाची सवय लावली होती

दुचाकीला धडक देत तब्बल 4 वेळा कार हवेत उडाली अन् मग…; पाहा घटनेचा लाईव्ह व्हिडीओ

“दिल्लीत एका युवकानं पवारांना हाणलं होतं, जितेंद्र आव्हाड हे विसरलेले दिसत आहेत”