Top news मनोरंजन

कंगनाला मोठा झटका! ‘या’ प्रकरणी कंगनाचीही चौकशी होणार?

मुंबई | बॉलिवूड क्वीन कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वा.दग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलीच चर्चेत आहे. कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीर सोबत केली होती. यामुळे अनेक शिवसेना नेत्यांनी कंगनावर तो.फ डागलली होती. यानंतर कंगना आणि शिवसेनेदरम्यान चालू झालेला हा वा.द अद्याप देखील कायम आहे. या सर्व वा.दात भाजप नेत्यांनी कंगनाची पाठराखण केली होती. मात्र, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुणे दौऱ्यावर असताना केलेल्या वक्तव्यामुळे भाजपनंही कंगनाची साथ सोडली की काय?, असा प्रश्न उभा राहिला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहेत. एनसीबीनं याप्रकरणी अनेकांना अ.टक केलं आहे. अशातच आता कंगनाचा अं.मली पदार्थ सेवन केल्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. प्रवीण दरेकर यांना कंगनाच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ संबंधित काही प्रश्न पत्रकारांनी विचारले होते.

कंगनाची अं.मली पदार्थ प्रकरणी चौकशी होऊ शकते का?,असा प्रश्न पत्रकारांनी दरेकर यांना विचारला होता. यावर उत्तर देताना दरेकर यांनी कंगना जर अं.मली पदार्थांचं सेवन करत असेल तर तिची 100 टक्के चौकशी व्हायला हवी, असं म्हटलं आहे.

आपल्या वैभवशाली बॉलिवूड क्षेत्रात जर कोणी नवीन कलाकार येत असतील आणि अं.मली पदार्थांच्या विळख्यात सापडत असतील तर या गोष्टीला पाठीशी घातलं जाऊ नये. आपण काळजी घेऊन आपल्या हिताच्या नसणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यामुळे कंगनाच्या चौकशीला कोणाचीही काहीही हरकत नसावी, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीनं ड्र.ग्ज पेड.लर्स अनुज केशवानी आणि अंकुश यांनाही ता.ब्यात घेतलं आहे. मंगळवारी या दोघांची चौकशी करत असताना अभिनेत्री दिया मिर्झाचं नाव समोर आलं आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी दिया मिर्झाला एनसीबी लवकरच चौक.शीसाठी बोलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच अं.मली पदार्थ प्रकरणी सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोन आणि नम्रता शिरोडकर या बड्या अभिनेत्रींचीही नावे समोर आली आहेत. याप्रकरणी चित्रपट सृष्टीतील आणखी कोणाची नावे समोर येतात हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रियानं जा.मीन अर्जात सुशांतवर केला ‘हा’ गंभीर आ.रोप! पाहा काय म्हणाली रिया

जिओनं लाँच केला सर्वात पॉप्युलर प्लॅन; रोज 3 GB डेटा मिळतोय फक्त ‘इतक्या’ रुपयात!

रेशनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी, नाहीतर…

मंदिराचा क्लर्क बनला करोडपती, 300 रुपयांच्या तिकिटावर लागली 12 कोटीची लॉटरी!

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? ‘या’ बड्या नेत्यानं दिली महत्वाची माहिती म्हणाले…