Top news मनोरंजन

सुशांत आणि साराच्या नात्यावर कंगनानं केला धक्कादायक खुलासा! करीना कपूरचं नाव घेत म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वा.दग्रस्त वक्तव्यांमुळ गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर कंगनानं बॉलिवूडमधील वाईट गोष्टींविरुद्ध जणू बंडच पुकारलं आहे. कंगनानं बॉलिवूड कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांवरही सुशांत प्रकरणावरून निशाणा साधला आहे. आता कंगनानं सारा अली खान आणि सुशांतच्या नात्याविषयी एका वृत्त वाहिनीशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे.

बॉलिवूड मधील मुव्ही मा.फियांनी सुशांतला त्रास दिला. सुशांतला या लोकांनी इंडस्ट्रीमध्ये बॅन केलं. अनेक प्रोडक्शन हाऊसेसनं सुशांतला बॅन केलं. या लोकांविषयी मी स्पष्टपणे बोलली आहे. या लोकांना फॉलो करणाऱ्या मीडियानं सुशांतच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढत त्याला रे.पिस्ट म्हटलं. याच सु.साईड गँगनं सारा अली खानला देखील टार्गेट केलं होतं, असा आरोप कंगनानं केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान दोघे एकमेकांना डेट करत होते. तेव्हा या सर्व लोकांना हेच वाटत होतं की त्यांचा ब्रेक अप व्हावा. करिना कपूर सुद्धा यावेळी साराला म्हटली होती की, आपल्या पहिल्या हिरोला डेट करू नकोस, अशी माहिती कंगना रनौतनं दिली आहे.

कंगना रनौतला मुंबईत देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेमागचं कारणही यावेळी कंगनानं सांगितलं आहे. राजकीय पक्षातील काही लोकांनी इंडस्ट्रीतील लोकांशी हातमिळवणी केली आहे. मी मराठ्यांबाबत काहीही बोलली नव्हती. मी अं.मली पदार्थांविषयी माहिती समोर आणल्यानं मी घाबरली होते. म्हणून मी केंद्राकडं सुरक्षेची मागणी केली होती. मला सुरक्षा मिळाली नसती तर साधूंसारखी मी ही मा.रले गेले असते, असंही कंगनानं म्हटलं आहे.

दरम्यान, कंगनानं बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी कंगनावर टीका केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही या वा.दात उडी घेत कंगनावर निशाणा साधला होता. उर्मिला मातोंडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कंगनानं उर्मिला यांची तुलना ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’ बरोबर केली आहे.

उर्मिला मातोडकर एक सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहितेय की हे अतिशय लज्जास्पद आहे. पण उर्मिला निश्चितच तिच्या अभिनयासाठी प्रसिध्द नाही, असं कंगनानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सिद्धार्थ पिठानीनं दिली धक्कादायक माहिती, दिशा सॅलियनच्या मृ.त्यूची बातमी ऐकून सुशांत…

‘उर्मिला मातोंडकर एक सॉफ्ट पॉ.र्नस्टार आहे’; कंगना पुन्हा बरळली

पवना डॅमवर झिंगाट पार्ट्या, सुशांत ‘या’ अभिनेत्र्यांना घेऊन यायचा; बोटचालकांची माहिती

ड्र.ग्ज पार्टी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार; ‘या’ सात बड्या कलाकारांची नावं गोत्यात!

दिशाचा मित्र गायब आहे का?; सेक्युरिटी गार्डनं केला मोठा खुलासा