Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

कंगनाचं ट्वीटर अकाउंट निलंबित होणार? मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

नवी दिल्ली |  अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगना काही तरी बोलली आणि वाद झाला नाही, असं क्वचितंच घडत असेल. कंगना सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त वक्तव्य करत असते. अशातच आता कंगना राणावत आणि दिलजित दोसांज यांच्यातील ट्वीटर वॉर चर्चेचा विषय ठरला आहे.

ट्वीटर वरील या वॉरमुळे सध्या ट्वीटरवर अनेक हॅशटॅग देखील ट्रेंड करत आहेत. याप्रकरणी कंगना विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. कंगनाचं अकाउंट निलंबित करण्याची मागणी या याचिकेत केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेत कंगना वारंवार ट्वीटरवरून तिरस्कार, वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंगना विरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल होताच कंगनाने या याचिकेवर आणखी एक ट्वीट केलं. यामुळे ट्वीटरवर हे वॉर चालू झालं आहे.

कंगनाने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मी रोजच अखंड भारताविषयी बोलत असते. रोज मी इथल्या तुकडे तुकडे टोळ्यांशी लढत आहे. तरीही माझ्यावरच देशद्रोहाचा आरोप केला जात आहे. वा! मात्र, माझ्यासाठी ट्वीटर हे एकमेव प्लॅटफॉर्म नाही.

एका इशाऱ्यात माझ्याकडे सर्व कॅमेरे इंटरव्युव घेण्यासाठी येतील, हे सर्वांनी लक्षात ठेवा. माझा आवाज तेव्हाच दाबला जाईल जेव्हा मी मरेल. पण यानंतर मी प्रत्येक भारतीयाच्या माध्यमातून बोलेल आणि हेच माझं स्वप्न आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी माझं स्वप्न आणि ध्येय साकार होईल. म्हणूनच मला खलनायक आवडतात, असं कंगनाने म्हटलं आहे.

दरम्यान, नुकतंच कंगनाने दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सामील झालेल्या एका वयोवृद्ध आजींवर कमेंट करत देखील सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली होती. मात्र, तिनं केलेल्या या वक्तव्यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

कंगनाने या आजींवर कमेंट करताना म्हटलं होतं की, दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सामील होणाऱ्या आजी शेतकरी आंदोलनात देखील सामील झाल्या आहेत. 100 रुपयांसाठी त्या आंदोलनात भाग घेतात. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिला ट्रोल करण्यात येवू लागल्यानंतर तिने ही पोस्ट डिलीट केली होती.

कंगनानं केलेल्या या पोस्टमुळे देखील दिल्लीतील एका वकिलांनी कंगनाला नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत तू माफी मागावी अन्यथा तुझ्यावर कारवाई करण्यात येईल, असं वकिलांनी नोटिशीत कंगनाला बजावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ दोन रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा सर्वात कमी धोका!

धक्कादायक! एम्सच्या डॉक्टरांना कोरोना रुग्णांमध्ये आढळली ‘ही’ दोन नवी लक्षणं!

एकनाथ खडसेंच्या आरोपानंतर 1100 कोटींच्या ‘त्या’ घोटाळ्यावर गिरीश महाजन म्हणाले…

टाटा, ह्युंदाई आणि महिंद्राला जोरदार टक्कर; अवघ्या 4 लाखात मिळणार ‘ही’ SUV

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होणार? शरद पवार म्हणाले…