कंगना पुन्हा बरळली! ‘त्या’ प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर अप्रत्यक्षपणे आरोप करत म्हणाली…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून अभिनेत्री कंगना राणावत चांगलीच चर्चेत आहेत. सुशांत प्रकरणी कंगनानं बॉलीवूड इंडस्ट्रीसह महाराष्ट्र सरकारवरही अनेकवेळा निशाणा साधला होता. कंगनानं सोशल मीडियावरून अनेकवेळा महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे अनेक स्तरांवरून कंगनावर देखील प्रत्यारोप करण्यात आले होते.

आपल्या वा.दग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या कंगना राणावत विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कंगना बरोबरच तिची बहिणी रंगोली हिच्या विरुद्ध देखील एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती मिळाली आहे.

कंगना राणावत हिंदू मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवण्याचं काम करत आहे. कंगना धर्मावरून अनेकवेळा वा.दग्रस्त आणि आक्षेपार्ह्य ट्वीट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे.

मोहम्मद अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीनं कंगना विरोधात वांद्रे सत्र नायालयात तक्रार दाखल केली होती. मोहम्मद अश्रफुल्ला सय्यद यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सत्र न्यायालयानं कंगनविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावरूनच कंगनानं आता पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला आहे.

ज्याप्रमाणे राणी लक्ष्मीबाई यांचा किल्ला तोडण्यात आला होता. त्याचप्रमाणे माझं घर पाडण्यात आलं. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वि.द्रोहासाठी जेलमध्ये टाकण्यात आलं त्याचप्रमाणे मलाही जेलमध्ये पाठवण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. इंटॉलरन्स गटातील लोकांना कोणीतरी जावून विचारा की त्यांनी या देशात किती त्रास सहन केला आहे ते, असं ट्वीट कंगनानं केलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना राणावत यांच्यामध्ये मधल्या काळात आ.रोप प्रत्या.रोपाची चांगलीच खेळी रंगली होती. कंगनानं काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टी.का केली होती. कंगनानं ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता.

मुंबईत काही वेळासाठी वीजपुरवठा ठप्प झाला होता. तसेच नुकतंच स्टँड अप कॉमेडीअन कुणाल कामरा यानं संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेतली होती. कंगनानं याच मुलाखती दरम्यानचा संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचा फोटो ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता.

एकीकडे मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार क क कंगना करण्यात व्यस्त आहे, असं ट्वीट कंगनानं केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या गायकाचं नि.धन, मोदींनीही शोक व्यक्त केला

मिर्झापूरचा दुसरा सिझन सापडला वादात; ‘या’ कारणामुळे बंदी येण्याची शक्यता!

एकनाथ खडसे यांचा धक्कादायक खुलासा! चंद्रकांत पाटलांविषयी सांगितलं ‘ते’ सत्य

काय सांगता! ‘ही’ गोष्ट न केल्यास LPG ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही

रावणाच्या कुंडलीत होता फक्त ‘हा’ एकच दोष; नाहीतर त्याचा मृत्यू अशक्य होता!