मुंबई | सध्या सत्तेसमोर सगळेच नतमस्तक होत असताना देशाचा इतिहास बदलू पाहणाऱ्यांविरोधात महाराष्ट्रातील तरुण लढा देण्याचे काम करील, असं काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.
‘कनेक्ट महाराष्ट्र कॅन्क्लेव्ह 2022’निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘लोकतंत्र’ या विषयावर कुमार बोलत होते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आमदार रोहित पवार या वेळी उपस्थित होते.
पुरोगामी महाराष्ट्रातील तरुणांनी देशाला दिशा दाखवावी. लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेवर येऊन एकाधिकारशाही निर्माण केली जात आहे. प्रश्न विचारला, की तुम्हाला देशद्रोही ठरवलं जात आहे.
इतिहास बदलण्याचं काम होत आहे. महागाई, बेरोजगारी या समस्यांवर बोलायला कोणीही तयार नाही. प्रश्न विचारण्याचा तुमचा अधिकार तुम्ही जिवंत ठेवा, असंही ते म्हणालेत.
हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर कन्हैय्या कुमार (kanhaiya kumar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दोस्त दोस्त ना रहा’ अशा शब्दात कन्हैय्या कुमार यांनी हार्दिक पटेल यांच्यावर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचं कल्याण होत नाही”
केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा!
“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही”
’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती!