“राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काम शरद पवार करतात”

मुंबई | सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कोणतंच काही नाही. त्याचं काम शरद पवार करत असल्याची टीका केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या ओबीसी जागर अभियानत ते बोलत होते.

कपिल पाटील यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. या सरकाराने ओबीसीचे राजकीय आरक्षण अद्यापही दिलेले नाही, मराठा समाज, धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. पण आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करीत असल्याची टीका कपिल पाटील यांनी केली आहे.

ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळावे यासाठी केंद्राने राज्याला अधिकार दिले असतांनाही आरक्षण देण्याऐवजी, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केवळ सरकार कसे टिकेल यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही कपिल पाटलांनी केली आहे.

यापुढे कितीही पक्ष एकत्र आले, तरी देखील यापुढे महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार असून फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढीव दराबाबत देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका करतांना, पेट्रोल, डिझेलचे दर वाढले तर त्यासाठी केंद्राकडे बोट दाखवलं जातं. मात्र क्रुड ऑईलचे दर वाढल्याने दर हे वाढत असतात, हे महाविकास आघाडी सरकारला माहित नाही का?, असा सवालही कपिल पाटलांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ सर्वांना बोनस मिळणार

“मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मेलो तरी त्यांना सोडणार नाही”

“अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो”

“देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या आणि जेवण घ्या”

आज 1 वाजता लागणार इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परिक्षांचा निकाल!