प्रेक्षकांना पोटभोर हसवणाऱ्या कपिल शर्मानं केलं आपल्या मुलाचं नाव जाहिर, वाचा काय आहे नाव

मुंबई| आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना पोटभोर हसवणाऱ्या कपिल शर्माचे अनेक चाहते आहेत. कपिल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेल्या पहायला मिळतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्याची पत्नि गिन्नी हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. कपिलने सोशल मीडियावरून ही बातमी शेअर करताच चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. कपिलने चाहत्यांचे आभारही मानले होते. मात्र त्यानं मुलाचं नाव जाहिर केलं नव्हतं. त्यामुळे त्याच्या बाळाचं नाव काय ठेवलं हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण आता नुकतंच त्यानं त्याच्या मुलाचं नाव जाहिर करत चाहत्यांना आनंदाची बातमी जाहिर केली.

कपिल शर्माने अखेर त्याच्या बाळाचं नाव काय ठेवलंय़ हे आता चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. गायिका नीति मोहन हिच्या एका ट्विटला उत्तर देताना कपिलने त्याच्या बाळाचं नाव सांगितलं आहे.

2 एप्रिलला कपिल शर्माचा वाढदिवस होता. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी आणि कपिलच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यात गायिका नीति मोहन हिने ट्विटरवरून कपिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ” हॅपी बर्थडे डियर कपिल पाजी. तुला आणि तुझ्या कुटुंबियांसाठी खूप सारं प्रेम. आता तरी मुलाचं नाव सांगा.” असं ट्विट तिने केलं होतं.

नीतीच्या या ट्वीटवर उत्तर देताना कपिलनं लिहिलं, ‘धन्यवाद नीतू. आशा करतो की, तू स्वतःची काळजी घेत असशील. आम्ही बाळाचं नाव त्रिशान ठेवलं आहे.’ त्रिशानचा अर्थ जीत म्हणजेच विजय असा होतो.

कपिलनं 2 एप्रिलला 40 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात कपिल दुसऱ्यांदा बाबा झाला होता. त्यानंतर त्यानं पॅटर्निटी लिव्ह घेतली होती आणि त्याचा शो ऑफ एअर झाला होता.

त्याच्या शोचा शेवटचा एपिसोड 31 जानेवारीला प्रसारित झाला होता. लवकरच या शोमधून कपिल टीव्हीवर कमबॅक करणार आहे. कपिलचा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2018 सालात कपिल शर्मा आणि गिन्नी विवाह बंधनात अडकले होते. त्यानंतर 10 डिसेंबरला कपिल आणि गिन्नीच्या आयुष्यात पहिली पाहुणी आली. कपिलने त्याच्या मुलीचं नाव अमायरा ठेवलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर अभिनेत्री कंगना राणौतचा…

‘त्याचा हात माझ्या पँटमध्ये होता’,…

चक्क तरूणाने केलं आपल्या मावशीसोबत लग्न, वाचा काय आहे प्रकरण

अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर सेटवर घडायच्या…

बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रीने खाल्ला आपल्या…