Top news देश मनोरंजन

मुकेश खन्ना यांनी अखेर ‘ते’ मोठं रहस्य उलगडलं; कपिल शर्माच्या शोमध्ये…

नवी दिल्ली | द कपिल शर्मा शो या प्रसिद्ध विनोदी शोचे भारतातच नाही तर जगभरातही अनेक चाहते आहे. द कपिल शर्मा शो यांच्या चाहत्यांची संख्याही खूपच तगडी आहे. टीआरपीच्या बाबतीतही हा शो खूपच पुढे आहे. पण असाही एक व्यक्ती आहे, ज्याला द कपिल शर्मा शो मुळीच आवडत नाही.

हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ज्यांची प्रसिद्धी एका काळात द कपिल शर्मा शो एवढीच होती. त्यांचा ‘शक्तिमान’ हा कार्यक्रम प्रत्येक घराघरात पाहिला जातो. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल पण हे अगदी खरं आहे.

अभिनेता मुकेश खन्ना यांना द कपिल शर्मा शो अजिबात आवडत नाही. नुकतेच कपिल याने ‘महाभारत’ या मालिकेतील कलाकारांना बोलावले होते. पण त्यामध्ये मुकेश खन्ना हे दिसले नाही. नुकतेच त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या मनातील गोष्ट दर्शकांना सांगितली आहे.

मुकेश खन्ना म्हणाले की, हा प्रश्न खूपच व्हायरल झाला आहे की, महाभारतातील भीष्म पितामह का आले नाही ? यावर काही जण म्हणतात की, त्यांना आमंत्रण मिळाले नाही. तर कोणी म्हणतंय त्यांनी स्वतः यायला नकार दिला असेल. ही गोष्ट अगदी खरी आहे की, भीष्म पितामहशिवाय महाभारत पूर्ण होऊ शकत नाही. पण मी यायला स्वतःच नकार दिला होता, असं मुकेश खन्ना म्हणाले.

भलेही कपिल शर्मा पूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे, परंतु मला त्याच्याहून फालतू शो कोणताच वाटत नाही. दुहेरी अर्थांनी भरलेला, अश्लीतेकडे प्रत्येक वेळी झुकणारा, असा हा शो आहे. ज्यात महिलांची कपडे पुरुष घालतात. निकृष्ट दर्जाच्या गोष्टी करतात आणि लोक पोट धरून हसतात.

हा शो पाहून लोक खी खी करून का हसतात, हे मला आजपर्यंत समजले नाही. एक व्यक्ती मध्ये सिंहासनावर बसते. त्याचं काम आहे, फक्त हसणे. हसायला येत नसेल तरीही हसणे. कारण त्याचेच त्यांना पैसे मिळतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. या शोचा विनोदाचा स्तर किती निकृष्ट दर्जाचा आहे, यावरून तुम्हाला समजेल.

कपिल अरुण गोविल यांना विचारतात. तुम्ही समुद्र किनाऱ्यावर अंघोळ करत आहात. तेवढ्यात गर्दीतून एक व्यक्ती ओरडून बोलला की, अरे पाहा पाहा रामजी पण व्हाआयपी अंडरवेअर घालतात. तुम्ही काय म्हणणार ?

मी याचा फक्त प्रोमो पाहिला होता. यावर अरुण गोविल हे फक्त हसले. ज्यांना संपूर्ण जग श्रीराम यांच्या भूमिकेत पाहतात, त्यांना एवढा निकृष्ट दर्जाचा प्रश्न कसा काय विचारू शकतात. मला माहित नाही की, अरुण गोविल यांनी यावर काय उत्तर दिले. मी असतो तर कपिलचे तोंड बंद केले असते. यामुळे मी गेलो नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

साऊथचे 7 जबरदस्त हिट हिंदी सिनेमे; हे पाहिले नाहीत तर काय पाहिलं?

रियानं सुशांतला आ त्मह.त्या करण्यास प्रवृत्त केलं होतं? सीबीआयचा मोठा खुलासा

मराठी रंगभूमीवर पुन्हा शोककळा! ‘हा’ बडा अभिनेता काळाच्या पडद्याआड

कोरोनामुळे नपुंसकत्व येवू शकतं; संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष

सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरे होते टार्गेटवर, स्टडी रिपोर्टचा धक्कादायक खुलासा!