कपिल शर्माची नरेंद्र मोदींच्या अंदाजात काॅमेडी म्हणाला, “मित्रो आज रात्री…”

मुंबई | भारतीय सिनेसृष्टीमध्ये कपिल शर्मा आपल्या एका वेगळ्या हास्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. अल्पावधितच कपिल शर्मानं प्रसिद्धी मिळवली आहे.

आपल्या काॅमेडीच्या माध्यमातून शर्मानी अनेक कार्यक्रम आणि स्टेज गाजवले आहेत. अभिनयाच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारणावर भाष्य करण्यात शर्मा पटाईत आहे.

सध्या सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या काॅमेडियनमध्ये कपिल शर्माचा समावेश होतो. त्याच्या शोला मोठी गर्दी असते.

सध्या कपिल शर्माच्या नवीन शोची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. कपिल शर्मा आपला नवीन काॅमेडी शो कपिल शर्मा आय एम नाॅट डन ऐटच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

आपल्या नवीन शोच्या प्रसिद्धीसाठी कपिल सध्या व्यस्त आहे. नवीन शोमध्ये कपिलनं पंजाबमधील तीन गोष्टी सांगत काॅमेडी केली आहे.

पंजाबमध्ये तीन गोष्टी फार लोकप्रिय आहेत. एक वाघा बाॅर्डर, दुसरी गोल्डन टेंम्पल आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही गोष्टींच्यामध्ये असणारे छोले-कुलचेवाले या गोष्टी प्रसिद्ध आहेत.

या छोले कुलचेवाल्यांना नेहमी एकच भीती असते कोणीतरी रात्री आठ वाजता येईल आणि म्हणेल मित्रो.., असं म्हणतं कपिल शर्मानं नरेंद्र मोदींना टोमणा मारला आहे.

कपिल शर्मानं या गोष्टींचा आणि पंजाबमधील छोले-कुलचेवाल्यांवर काॅमेडी करताच उपस्थित प्रेक्षकांना आपलं हसू अनावर होतं. प्रेक्षकांना कपिलच्या काॅमेडीचा रोख मोदींकडं आहे याची कल्पना आलेली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मोदींच्या सुरक्षेवरून पंजाब सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांविरूद्ध उभे ठाकले असताना आता कपिल शर्माच्या या काॅमेडिनं नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ –

महत्वाच्या बातम्या-

 राहुल गांधींनी उलटच केलं! पक्षातील ‘ही’ परंपरा मोडण्यासाठी घेतला मोठा निर्णय

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख 

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत महत्वाची माहिती समोर