कपिल शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा! इयत्ता चौथीच्या पुस्तकात सामील कॉमेडी किंगचा खडतर प्रवास

मुंबई| भारताचा कॉमेडी किंग म्हणून कपिल शर्मा ओळखला जातो. कपिलचा साधारण कुटूंबातून येऊन कॉमेडी किंग होण्यापर्यंतचा प्रवास हा खडतर होता. त्याचा हाच खडतर प्रवास आता मुलांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग झाला आहे.

आजपर्यंत आपण संत, स्वातंत्र्यसैनिक किंवा अन्य देशभक्तांचा शालेय जीवनात अभ्यासकेला आहे. म्हणजेच त्यांच्या सोबत घडलेल्या घटना किंवा देशासाठी असणारा त्यांचा वाटा या गोष्टींचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये होता. मात्र आत्ता चक्क टीव्हीवरील एका हास्यसम्राटाचा धडा शाळकरी मुलांच्या अभ्यासक्रमात असणार आहे.

टीव्हीवरील प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माचा समावेश आता शालेय अभ्यासक्रमात झाला आहे. कपिलनं स्वतः याबद्दलची माहिती आपल्या सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

चौथीच्या अभ्यासक्रमातील सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात कपिल शर्मा याची माहिती असलेला एका धडा सामील करण्यात आला आहे. हा धडा वाचून चौथीच्या वर्गातील मुले त्याच्या या संघर्ष कथेतून प्रेरणा घेण्यास सक्षम होतील.

कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटस्टोरीवरून ही माहिती दिली. त्याच्या एका फॅन क्लबने ती पोस्ट शेअर केली होती. तिच पोस्ट कपिलने त्याच्या स्टोरीवर शेअर केली. या स्टोरीमध्ये इयत्ता 4थी मधील मुलांना जीकेच्या पुस्तकातून कपिल शर्माचा धडा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या धड्यात कपिलचा ‘ द कपिल शर्मा शो’च्या सेटवरील एक फोटो आणि एक ‘किस-किस को प्यार करूं’ या चित्रपटातील आहे. कपिलच्या या धड्याला ‘द कॉमेडी किंग कपिल शर्मा’ असे नाव दिले आहे.

कपिलला हे यश सहज मिळालेलं नाही. यासाठी कपिलनं खूप मेहनत घेतली आहे. कपिलच्या अगदी कमी वयात त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. तो काळ कपिल आणि त्याच्या कुटुंबासाठी खुपचं कठीण होता. कपिल आपल्या बऱ्याच मुलाखती दरम्यान याबद्दल सविस्तर बोलला आहे.

कपिल शर्माने आजवर मिळवलेलं स्थान भारताच्या विनोदी कलाकारांच्या इतिहासातील सर्वात मोठे आहे. कपिल एका दशकापेक्षा जास्त काळ टीव्हीचा राजा आहे. स्टँड अप कॉमेडीपासून सुरू झालेली त्याची कारकीर्द आज किंग ऑफ कॉमेडीच्या पदावर पोहोचली आहे.

दरम्यान, कपिल शर्माचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी बंद झाला. यानंतर कपिलने जाहीर केले की, तो लवकरच नेटफ्लिक्सवर आपला कॉमेडी शो आणत आहे. ज्याचं स्वरूप त्याच्या टीव्ही शोपेक्षा पूर्णपणे वेगळं असेल.

kapil sharma1

महत्वाच्या बातम्या – 

‘या’ अभिनेत्रीच्या चित्रपटातून इरफान खानचा मुलगा…

‘महाभारत’मधील इंद्राची भूमिका साकारणाऱ्या…

बिहारमधील फरार आरोपीच्या घरी बँड बाजासह पोहचली पोलीस; पाहा…

ट्विटरवरील वादानंतरही तापसीनं कंगनाचे मानले आभार, म्हणाली….

चोर गाडी चोरायला आला अन् 82 वर्षीय आजोबांनी त्याला चांगलाचा…