काँग्रेसला साठ वर्ष दिलीत मला साठ महिने द्या, मोदीजी आठवतंय का?- कपिल सिब्बल

नवी दिल्ली | सध्या देशाच्या जीडीपीचे आकडे समोर आल्यापासून विरोधी पक्षाने केंद्रात असलेल्या भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका करू लागले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी थेट मोदींवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. अशातच काँगेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर पक्षातले वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मोदींना त्यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

1966 पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरी असल्याचं समोर येत आहे. यावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत कपिल सिब्बल यांनी त्यांना एक प्रश्न विचारला आहे.

जीडीपी उणे 23.9 टक्के. मोदीजी, तुम्हाला आठवतंय का?,अच्छे दिन, ‘सबका साथ सबका विकास, तुम्ही काँग्रेसला साठ वर्षे दिली, मला फक्त साठ महिने द्या, आता पकोडे तळायची वेळ आली आहे. आणि तेही विकले जाणार नाहीत, असं सिब्बल यांनी म्हटलं आहे.

फक्त भाषण, शून्य शासन, असं म्हणत सिब्बल यांनी मोदींना लक्ष्य केलं. नरेंद्र मोदी यांवी 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सबका साथ, सबका विकास त्याबरोबर अब अच्छे दिन आयेंगे, या घोषणा वारंवार देत होते.  मोदींनीही करून दाखवत आपसी सत्ता केंद्रात आणली.

भारताचा तिमाही म्हणजे एप्रिल ते जून महिन्यातील जीडीपीचा दर थेट शून्याखाली घसरला आहे. 23.9 टक्यांनी कमी झाला असल्याचं सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

सिब्बल यांच्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावरून मोदींवर निशाणा साधला होता. जीडीपी 24 टक्क्यांनी कोसळला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. प्रत्येक इशाऱ्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जाणं खूप दुर्दैवी आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ शिवसैनिकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला

‘या’ कारणासाठी रियानं सोडलं होतं सुशांतचं घर; रियाच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा!

मोदी सरकारला कशाचीच शरम नाही अन् ते स्वतःच्या चुका मान्यही करत नाहीत- पी. चिदंबरम

सीबीआय समोर अखेर रियानं उलघडलं महेश भट्ट आणि तिच्या नात्याविषयीचं गूढ

“वंचित बहुजन आघाडीची पावलं हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर नव्या दिंडीयात्रेचं स्वागत”