Top news मनोरंजन

करण जोहर पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, “माझा त्या प्रकाराशी काहीही संबंध नाही”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृ.त्यू प्रकरणात एक नवीनच पैलू समोर आला आहे. तो म्हणजे ड्र.ग्जच्या कनेक्शनचा… या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे नावे समोर आली आहेत. या प्रकरणात एन.सी.बीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह काही जणांना अ.टक केली आहे.

बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील अनेक मोठ-मोठ्या कलाकारांना या प्रकरणाबाबत एन.सी.बीने स.मन्स पाठवला आहे. आता या यादीमध्ये करण जोहरचेही नाव जोडण्याची शक्यता दिसत आहे.

काही मीडियाच्या अहवालात एका पार्टीमुळे करण जोहरला स.मन्स जारी करण्याची शंका वर्तवण्यात येत आहे. या दरम्यान करण जोहरने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं आहे.

करण जोहरने जारी केलेल्या निवेदनातुन मीडियाच्या अहवालाबाबत उत्तर देताना म्हणाला की, माझ्याकडून दिलेल्या कोणत्याही पार्टीत मी कधीही ड्र.ग्जचा वापर केला गेलेला नाही आणि त्याचे से.वनही केले नाही. तसेच क्षितिज प्रसाद आणि अनुभव चोपडा यांच्याशी माझा काहीही संबंध नाही, ते कोणीही माझ्या जवळचे लोक नाहीत.

त्याने आपल्या निवेदनात म्हटलंय, “काही वृत्त वाहिन्या, प्रिंट आणि डिजिटल माध्यम, सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या दाखवत आहेत की, करण जोहरने २८ जुलै २०१९ रोजी आपल्या घरी पार्टी दिली आणि त्यात ड्र.ग्जचे से.वन केले.”

२०१९ मध्येच मी स्पष्ट केलंय की, हे सर्व आरोप खोटे आहे. आता पुन्हा त्या बातम्या चालवत आहेत. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की, हे सर्व आरोप निराधार आणि साफ खोटे आहे. त्या पार्टीमध्ये कोणत्याही ड्र.ग्जचे से.वन केले गेले नव्हते.

पुढे करण जोहरने लिहिलंय, “मी पुन्हा एक गोष्ट स्पष्ट सांगतो की, मी कोणत्याही प्रकारच्या ड्र.ग्जचे से.वन करत नाही आणि मी अशा कोणत्याही पदा.र्थांचे से.वन करण्यासाठी प्रोत्साहन देत नाही.”

अनुभव चोपडा हे धर्मा प्रॉडक्शनचे कर्मचारी नाहीत. ते फक्त नोव्हेंबर २०११ ते जानेवारी २०१२ असे दोन महिने काम करत होते. त्याचबरोबर क्षितिज प्रसाद हे धर्मा प्रॉडक्शनच्या सहायक कंपनीद्वारे कॉन्ट्रॅक्ट आधारावर नोव्हेंबर २०१९ मध्ये जोडले गेलेले होते, या व्यतिरिक्त त्यांचा माझ्याशी काहीही संबंध नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

दीपिका पदुकोणची 100 कोटी किंमतीची ‘ही’ गोष्ट सापडलीय संकटात?

कशाला घाबरतोय सलमान खान? सलमाननं स्वतःच केला मोठा खुलासा म्हणाला…

कंगना राणावत आणि महेश भट्ट यांचा ‘तो’ फोटो व्हायरल, राखी सावंत म्हणाली…

दीपिकाच्या ‘त्या’ व्हॉट्सअप ग्रुपबाबत मोठी माहिती समोर, ज्यामध्ये लिहिलं होतं ‘माल है क्या?’

…म्हणून ‘ही’ अभिनेत्री अक्षय कुमार समोर कपडे काढायला तयार झाली होती