मनोरंजन

करनजीत कौर कशी बनली सनी लिओनी?; पहिला व्ही़डिओ आला समोर…

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीची कहाणी लवकरच सर्वांसमोर उलगडणार आहे. करनजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी असं सनी लिओनीवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सिरीजचं नाव आहे. झी 5 ची निर्मिती असलेली ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

सनीचा जन्म 1981 साली झाला. करिअरमध्ये अनिश्चितता असल्यामुळे वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी सनी लिओनीने पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. तिच्या मैत्रिणीने तिला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला होता. ज्या मॅगझिनसाठी तीनं पहिलं ऑडिशन दिलं ते पॉर्न मॅगझिन होतं. तिथूनच सनीचा प्रवास सुरु झाला. 

पॉर्न इंडस्ट्रीत सनी राणी बनली होती. प्रसिद्धी आणि पैसा तिच्या पायाशी लोळण घालत होता. मात्र तिला कौटुंबिक सुख भेटत नव्हतं. त्यामुळे सनी कुठेतरी अस्वस्थ होती. भारतातील बिग बॉसमध्ये संधी मिळाल्यानंतर तिचं आयुष्य बदलून गेलं. तिला बॉलिवूडमधून ऑफर्स आल्या. 

बॉलिवूडमध्ये सुरुवातीला अनेकांनी तिच्याकडे पाहून नाकं मुरडली, मात्र इथल्या प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं. तिच्या फिल्मला मिळणारा प्रतिसाद पाहून तिला आणखी फिल्म मिळू लागल्या. पॉर्न इंडस्ट्रीत गुरफटलेली सनी बाहेर पडली. हा आणि असा सारा सनीच्या आयुष्याचा पट लवकरच उलगडणार आहे. 

IMPIMP