मुंबई | बॉलिवूडच्या स्टार किड्सपैकी तैमूर अली खान सगळ्यात प्रसिद्ध आहे. एखाद्या अभिनेता-अभिनेत्रीला मिळत नाही अशी प्रसिद्धी सध्या त्याच्या वाट्याला येत आहे. तैमूरला प्रसिद्धी मिळत असली तरी त्याच्या आई-वडिलांना त्याची काळजी वाटत आहे. करिना कपूर आणि सैफ अली खान यांनी अनेकदा ही बाब बोलून दाखवली आहे. तैमूर अजून खूपच लहान आहे मात्र आताच त्याच्या आई-वडिलांना त्याच्या करिअरबाबत काळजी वाटत आहे. नुकतीच करिनाने ही काळजी बोलून दाखवली.
तैमूरबद्दल काय म्हणाली करिना?
तैमूरबाबत त्याचे आई-वडिल करीना कपूर आणि सैफ अली खान फारच जागरुक आहेत. करिनाचं शिक्षण फारसं झालेलं नाही. आपल्या मुलाबद्दल असं काही होऊ नये, असं तिला वाटतं. नुकतंच तीनं याबद्दल जाहीर भाष्य केलं.
तैमूरने आधी त्याचं शिक्षण पूर्ण करावं आणि मगच त्याने त्याचं करिअर निवडावं, अशी करिना कपूरची इच्छा आहे.
मला पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. शिक्षण पूर्ण न करता आल्याची मला फारच खंत वाटते. आजही ही खंत मला जाणवत राहते. माझा मुलगा तैमूरच्या बाबतीत मात्र असं होऊ नये, असं मला वाटतं. त्यानं त्याचं शिक्षण पूर्ण करायला हवं, असं करिनानं म्हटलं आहे.
करिनानं कपूरनं का शिक्षण घेतलं नाही?
करिना कपूर घराण्यात जन्माला आलेली मुलगी. तिच्या अनेक पिढ्यांनी सिनेमात काम केलेलं. कळायला लागायच्या वयात सुंदरतेचं वरदान लाभलेल्या करिनाला बॉलिवूडचे दरवाजे खुणावू लागले. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी तिला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. करिनाला स्वतःला हिरोईन बनण्याची इच्छा होती त्यामुळे तीने आलेली संधी सोडली नाही. तीने वयाच्या १७ व्या वर्षीच सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. करिनाने हा निर्णय घेतला मात्र त्यासाठी तीला एका गोष्टीचा त्याग करावा लागला. तिला तीचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.
“वयाच्या १७ व्या वर्षी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मला अभिनेत्री व्हायचे होते. माझ्या आवडीचे क्षेत्र होते त्यामुळे मी या सिनेक्षेत्रात उडी घेतली. मात्र आज मागे वळून पाहताना असे वाटते, की मी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायला हवे होते. तैमूरबाबत मला कोणी विचारले, तर मी हेच सांगेन की त्याने आधी त्याचे शिक्षण पूर्ण करावे, असं करिना कपूरनं म्हटलं आहे.
करिना कपूरला तैमूरच्या भवितव्याची चांगलीच काळजी आहे. त्यामुळे आपल्यासोबत जे झालं ते आपल्या मुलासोबत घडू नये, असं तिला वाटतं. आता तैमूर काय करतो हे येणारा काळच सांगू शकेल.