मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. करिनाप्रमाणे तिच्या दोन्ही मुलांची देखील सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते.
करिना व सैफ अली खानने 2012 साली लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्यांना तैमुर अली खान व जहांगीर अली खान असे दोन मुलंही झाले.
करिनाच्या दोन्ही मुलांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. त्यातच आता करिना तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.
काही दिवसांपासून करिनाचा एक फोटो व्हायरल होत होता. त्यात करिना गरोदर असल्याचं स्पष्टपणे भासत होतं.
या चर्चांना आता करिनाने पूर्णविराम दिला असून स्वत:च तिच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल खुलासा केला आहे. करिनाने तिच्या अधिकृत इंन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
शांत रहा. मी प्रेग्नेंट नाही. सैफ म्हणतो त्याने लोकसंख्यावाढीत आधीच खूप योगदान दिलं आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया करिनाने दिली आहे.
दरम्यान, माझं जे पोट दिसत आहे ते फक्त पास्ता आणि वाईनमुळे आहे, असंही करिना म्हणाली आहे.
Kareena’s latest Instagram story! pic.twitter.com/WiR4OHYkKo
— Kareena Kapoor Khan (@KareenaUpdates) July 19, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
‘घोटाळे तुम्ही करायचे, लफडी तुम्ही करायची पण जेव्हा…’, खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे संतापले
सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 1 ऑगस्टला, राजकीय पेच कायम
‘बाळासाहेबांनाही आम्हीच पक्षात आणलं असंही ते म्हणतील’, संजय राऊत आक्रमक
शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार?, आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी
संजय राऊत हाजीर हो! राऊतांना ईडीचा तिसऱ्यांदा दणका