मुंबई| करीना कपूर खान सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आता काही दिवसांपूर्वीच तिने दुसऱ्या बाळालाही जन्म दिला आहे. यानंतर आता तिने कामाला सुरुवात केली आहे. यातच करीना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
बॉलिवूडमधील काही कलाकार व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. आता तर चक्क करीनाने आपल्या बेडरूममधील एक किस्सा शेअर केला आहे.
एका महिन्यापूर्वीच तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर तिने काही काळ कामातून विश्रांती घेतली होती. आता ती पुन्हा ‘स्टार व्हर्सेस फुड’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या एका खास एपिसोडमध्ये ती पिझ्झा बनवताना दिसणार आहे. या दरम्यान ती तिच्या गरोदरपणातले अनुभव सांगणार आहे. तिला या काळात सर्वात जास्त पिझ्झा आणि पास्ता खाण्याची इच्छा होत होती असंही ती म्हणाली.
या बद्दल बोलताना ती म्हणते, “मला गरोदरातपणात कायम पिझ्झा आणि पास्ता खाण्याची इच्छा होत होती. हे माझा मुलगा आणि पती या दोघांसाठीही विचित्र होतं.” जेव्हा तिला विचारलं की तिच्या घरातलं किचन कोण सांभाळतं तेव्हा तिने सांगितलं, “तैमूर आणि सैफला ते फार आवडतं. त्यांना किचनमधलं काम करायला फार आवडतं. आणि माझ्याकडे संगीताची जबाबदारी आहे. त्या दोघांनाही जॅझ संगीत ऐकायला आवडतं.”
करीनाने हा किस्सा स्वतः शेअर केला आहे. करीना झोपण्यापूर्वी आपल्या बेडवर तीन गोष्टी घेऊन जाते. करीनाने सांगितलं की,’बेडवर झोपण्यापूर्वी मी तीन गोष्टीसोबत घेते. पहिली गोष्ट वाइनची बॉटल, पजामा आणि नवरा सैफ. ही गोष्ट ऐकून तिथे उपस्थित असलेले लोकं हसू लागले.’
करीनाला या सगळ्या गोष्टी सांगण्यास काहीच हरकत नाही. पुढे करीना म्हणाली, मला नाही वाटत यापेक्षा सर्वात जास्त मजेशीर काय उत्तर असू शकेल. मला याकरता बक्षिस मिळायला हवं.
करीना ‘स्टार वर्सेस फूड’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. इतकेच नाही तर या शोच्या एका खास एपिसोडमध्ये ती खास पिझ्झा बनवताना दिसणार आहे. डिस्कव्हरी प्लस या वाहिनीवर 15 एप्रिलपासून प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये करण जोहर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, प्रतिक गांधी हे कलाकारही दिसणार आहेत.
करीनाने या शोचा टीझरही नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा टीझऱ शेअर करताना तिने कॅप्शनही दिलं आहे. यात ती म्हणते, “जे कोणी कपूर खानदानाला ओळखतात त्यांना चांगलंच माहित आहे की आम्ही कपूर खाण्याचे किती शौकिन आहोत.”
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
कोरोनावर मात केल्यानंतर आलिया भट म्हणाली…
12 वर्ष लहान असलेल्या करीनाशी लग्न का केलं? सैफ अली खाननं…
‘या’ अभिनेत्रीला एकदा सोडून दुसऱ्यांदा झाली…