प्रेग्नंसी दरम्यानचा ‘सेक्स लाईफ’बद्दल करीनाचा मोठा खुलासा!

मुंबई | अभिनेत्री करीना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. ९ ऑगस्ट रोजी करीनाने तिचं ‘करीना कपूर खान प्रेग्नंसी बायबल’ हे पुस्तक इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत प्रकाशित केलं आहे. यावेळी करीनाचा मित्र आणि दिग्दर्शक करण जोहर देखील करीनासोबत लाईव्ह होता.

या पुस्तकामध्ये करीनाने प्रेग्नंसी दरम्यान गर्भवती महिलांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तसेच लाईव्ह दरम्यान करीनाने प्रेग्नंसी दरम्यानचे काही किस्से देखील चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. प्रेग्नंसीच्या वेळी सैफ अली खानने तिला कशी साथ दिली, हे देखील यावेळी करीनाने सांगितलं आहे.

यावेळी करीना म्हणाली की, ज्यावेळी तुम्ही गरोदर असता त्यावेळी लोकांना हे माहित नसतं की नक्की तुम्हाला काय वाटत आहे. तुम्ही प्रेग्नंट असता त्यावेळी लोकांना वाटते की तुम्हाला सेक्सबाबत काही भावना नाहीत. परंतु तुम्ही सर्व गोष्टी फील करत असता.

अशावेळी पुरुषाचे सोबत असणे खूप गरजेचे असते. यावेळी तुमचा पती तुमच्यासोबत हवा. प्रेग्नंसीच्या काळात सैफने मला मोलाची मदत केली आहे, असं करीनाने यावेळी म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना करीना म्हणाली की, ज्यावेळी मी गरोदर होते त्यावेळी कधी मी आनंदी असायचे. तर कधी मी मजेत आणि सेक्सी फील करायचे. त्यावेळी मला वाटायचे की मी हे कसं करु शकते. मला काहीच समजत नव्हतं. शेवटच्या काही दिवसांमध्ये मी खूप खचून गेले होते.

त्यावेळी मला असं वाटू लागलं होतं की जणू माझे पाय 100 किलोचे झाले आहेत. यावेळी माझी खूप चीडचीड होत होती. परंतु सैफने मला यावेळी खूप चांगल्याप्रकारे सांभाळून घेतलं, असं देखील करीनाने यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, करीनाने नुुकताच काही दिवसांपूर्वी आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. करीना आणि सैफने आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव जेह असं ठेवले आहे. मात्र, करीनाने अद्याप आपल्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही.

महत्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद! आयसीयूमध्ये अभ्यास करत शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर

माकडाशी पंगा घेणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

अभिनेता सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली ‘ही’ खंत

भर मंडपात ब्राम्हणाने नवरीसोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

बिबट्यानं हरणावर केला हल्ला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ