Karishma Kapoor | अभिनेत्री करिश्मा कपूर बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीमध्ये सक्रिय नाही. 90 च्या दशकात तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ केलंय. आजही तिचा चाहता वर्ग टिकून आहे.तिच्या अभिनयाचे जितके चाहते आहेत तितकेच तिच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. अशात करिश्माने केलेल्या एका खुलाश्यामुळे सध्या तिची जोरदार चर्चा रंगली आहे. करिश्माने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय.
अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा?
करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न गाठबांधली होती. त्याधी करिश्मा कपूरने अभिषेक बच्चनसोबत साखरपडा केला होता, मात्र काही कारणांमुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. अभिषेकसोबतचे लग्न मोडल्यानंतर करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत संसार थाटला.
दरम्यान, करिश्माने (Karishma Kapoor) 2003 मध्ये संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप केले होते.
View this post on Instagram
लिलाव केला-
एका मीडिया रिपोर्टनुसार, करिश्माने तिच्या हनीमूनचा एक प्रसंग सांगितला आहे. ‘हनीमूनच्या दिवशी संजयने मला त्याच्या एका मित्रासोबत झोपायला लावलं. मी नकार दिल्यानंतर त्याने मला मारहाण केली. त्यानंतर त्याने माझ्यावर प्राईस टॅग लावून एका मित्रासमोर माझा लिलाव केला.’, असा धक्कादायक खुलासा करिश्माने केला आहे.
‘माझ्या गरोदरपणात माझ्या सासूबाईंनी एक ड्रेस माझ्यासाठी आणला होता, पण तो मला नीट बसला नाही. तेव्हा संजयने माझ्या सासूबाईंना मला मारायला सांगितलं’, असंही करिश्मा म्हणाली आहे.