‘पवार साहेब रोहित दादांना मंत्री करा’; बारामतीत कार्यकर्त्यांची पोस्टरद्वारे मागणी

अहमदनगर | महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं सरकार आलं आहे. मात्र, अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशातच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्री करा, अशा आशयाचे पोस्टर मंतदारसंघात झळकले आहेत.

‘खासदार शरद पवार यांना विनंती करतो की आमदार रोहित पवार यांना नामदार करा’ अशा मजकुराचे पोस्टर कर्जत जामखेड मतदारसंघात झळकले आहेत. कार्यकर्त्यांची ही इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पूर्ण करतात का हे पाहावं लागेल.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं असलं तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे तिन्ही पक्षांतील आमदारांना मंत्रिपदाची आशा लागली आहे. त्यामुळे आपापले दबाव गट तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसतंय.

दरम्यान, शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे राम शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यांनी तब्बल 60 हजार मतांनी शिंदेचा पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या-