लॉकडाउनमध्ये ‘या’ भाजप आमदाराच्या मुलाची राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बंगळुरू | देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकारांनी लोकांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नये अशी सूचना केली आहे. मात्र कर्नाटकमधील भाजप आमदाराच्या मुलाने घराबाहेर पडत राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी केल्याची घटना समोर आली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत भाजप आमदार निरंजन कुमार यांचा मुलगा म्हैसूर-ऊटी राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. शहरातील आयटीआय कॉलेजजवळ हा प्रकार घडला आहे. लोकांना घऱाबाहेर पडताना मास्क घालण्याचं आवाहन केलं जात असताना निरंजन कुमार यांच्या मुलाने मात्र मास्क घातलेलं दिसत नाहीये.

मी काल बंगळुरुत होतो, नुकतंच म्हैसूर येथे आलो आहे. काय झालंय याची मला नेमकी माहिती नाही. मी याची माहिती घेईन. जर त्याची चुकी असेल तर मी त्याला काय चुकीचं आहे आणि काय योग्य हे समजावून सांगेन. मी त्याची बाजू घेणार नाही. जर चुकी झाली असेल तर मी त्याला सांगेन, असं निरंजन यांनी म्हटलं आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदाराच्या मुलावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; आता घरपोच दारु मिळणार, पण…

-‘तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत’; जयंत पाटलांचं नर्सना भावनिक पत्र

-भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला विधानपरिषदेची उमेदवारी

-कौतुकास्पद! कर्ज काढून ‘या’ अभिनेत्याने कर्मचाऱ्यांना दिला पुढील सहा महिन्यांचा पगार

-लॉकडाउनमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड