देश

कर्नाटक विधानसभा अध्यक्षांचा भाजपला मोठा दणका

 बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळल्यानंतर आता भाजपचं सरकार स्थापन झालं आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे 3 तर जेडीएसच्या 8 बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपला सत्ता स्थापनेला वेळ लागला नाही. 

विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी काँग्रेस-जेडीएसच्या 14 बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केलं आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी 3 आमदारांना अपात्र घोषित ठरवलं होतं.

काँग्रेस-जेडीएसच्या 17 आमदारांनी बंडखोरी करत पक्षाकडे राजीमाने सोपवले होते. त्यानंतर कुमारस्वामी अल्पमतात आल्याने त्यांना कुमारस्वामी सरकारला बहुमत गमवावे लागले. 

रोशन बेग, आनंद सिंह, एच. विश्वनाथ, एस. टी. सोमशेखर या बंडखोर आमदारांना कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी अपात्र घोषित केलं आहे. 

विधानसभेचा कार्यकाल 2023 पर्यंत आहे. अपात्र घोषित केलेल्या आमदारांना विधानसभेची पोटनिवडणुकही लढू शकणार नाहीत. 

महत्वाच्या बातम्या-

-भाजपात प्रवेश का चालू आहेत याचा जरा विचार करा; उगीच सहानभूती मिळवू नका- चंद्रकांत पाटील

-“पळपुट्यांना पळू द्या… आपण एकलव्य आहोत; विधानसभा जिंकून साहेबांना गुरूदक्षिणा देऊ”

-साथ सोडलेल्यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी आखली ‘ही’ मोठी रणनीती!

-राजीनामा देण्याअगोदर चित्रा वाघ माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या….- शरद पवार

-‘हे’ पाच महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीसोबतच; शरद पवारांचा दावा

IMPIMP