कार्तिक आर्यनने घेतलेल्या ‘लॅम्बोर्गिनी’समोर असं काही केलं की…, पाहा व्हिडीओ

मुंबई |  बॉलिवूडमधील अभिनेते- अभिनेत्री कोणत्याना-कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. कधी कोणता अभिनेता आपल्या फिल्ममुळे चर्चेत असतो, तर कोणता त्याच्या एखाद्या फोटोमुळे. अशातच बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन सर्वांचा विषय बनला आहे.

अलिकडेच अभिनेता कार्तिक आर्यनने नवीन ‘लॅम्बोर्गिनी’ कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत तब्बल साडेचार कोटी रूपये आहे. त्याच्या या गाडीची चर्चा सोशल मिडीयावर चांगलीच रंगू लागली आहे. बुधवारी 7 एप्रिल रोजी कार्तिक आर्यन त्याच्या नवीन कारसोबत स्पोट झाला होता.

गाडीतून खाली उतरल्यानंतर कार्तिक आर्यनने असे काही केलं की, सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहिले. जर आपण नवीन गाडी घेतली तर त्या गाडीसोबत फोटो काढतो, सेल्फी्स काढतो. मात्र यापैकी काहीच न करता कार्तिकने त्याने नवीन घेतलेल्या ‘लॅम्बोर्गिनी’ला वाकून नमस्कार केला.

कार्तिकचा हा व्हिडीओ सध्या सोशळ मिडीयावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. कार्तिकने त्या गाडीला वाकून नमस्कार केला. जसकाही तो एका मोठ्या व्यक्तीच्या पायापडतं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, कार्तिक आर्यन गाडीतून खाली उतरून आपल्या मित्राच्या घराकडे जात आहे. अचानक तो मागे वळला आणि त्याने गाडीला वाकून नमस्कार करत आहे. तसेच कार्तिकची ही अदा कॅमेऱ्याक कैद करण्यासाठी कॅमेरामॅनने त्या पुन्हा तसं करायला सांगितल्यावर, कार्तिकने कॅमेरासाठी खूप चांगल्या पोझेसही दिल्या.

कार्तिकचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडीओ ‘viralbhayani’ या यूजरने आपल्या इंस्टग्राम आकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तसेच व्हिडीओ पोस्ट करताना यूजरने  ‘He bows down to his his new car as he has earned it the hard way. ‘ असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, कार्तिक आर्यनने नवीन गाडी घेतली तेव्हा त्याच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करत त्याने ‘मी विकत घेतली पण मी कदाचित या महागड्या वस्तूंसाठी बनलेलो नाही’ असं कॅप्शन दिलं होतं. तसेच या व्यतिरिक्त कार्तिकडे स्वत:ची बीएमडब्ल्यू आहे.  ही गाडी त्याने 2010 मध्ये घेतली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाच्या बातम्या-

राशीभविष्य : आज ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे…

कोरोनावर मात केल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापट…

हाय गर्मी! ‘टकाटक’ गर्लच्या या लूकने चाहते…

‘आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स…’; व्येशा…

कोरोनाच्या विळख्यात सापडला ‘हा’ प्रसिद्ध…