“…म्हणून मी भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे”; करुणा मुंडे यांचा मोठा दावा

मुंबई | दसरा मेळावा (Dasara Melawa) आणि राजकारण हे दोनही महाराष्ट्राच्या राजकारणातील अविभाज्य घटक आहेत. दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर दसरा मेळावा कोणी घ्यावा, याकरिता सध्या शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात चढाओढ सुरु आहे.

दोनही गटांनी मुंबई महापालिकेकडे सभेच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत. तसेच दोनही गटांकडून आरोप प्रत्यारोप आणि वाद सुरु आहेत. दरम्यान राज्यात आणखी एक दसरा मेळावा होणार आहे.

मुंबईतील दसरा मेळाव्याबरोबर आता भगवान गडावर देखील दसरा मेळावा होणार आहे. करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

आपण मुंडे घराण्याची सून असल्याने मेळावा घेण्याचा अधिकार आपल्याला असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना केला आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत मी सुद्धा स्पर्धेत आहे. मी भगवान गडावर दसरा मेळावा घेऊ इच्छित आहे.

तसेच मी गेल्या 26 वर्षांपासून वंजारी समाजाची, मुंडे घराण्याची सून आहे. मी येत्या दसऱ्याला भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे. त्यावेळी महाराष्ट्राने माझे स्वागत करावे, असे देखील करुणा मुंडे म्हणाल्या.

भगवान गडावर दिवंगत गोपिनाथ मुंडे (Gopinath Munde) हे दसरा मेळावा घेत असत. ते हयात असताना त्यांनी तब्बल 35 वर्षे हा दरसा मेळावा घेतला होता. त्यामुळे भगवान गडावरील मेळाव्यास देखील मोठे महत्व आहे.

महत्वाच्या बातम्या – 

गोळीबार प्रकरणी सदा सरवणकरांवर दादर पोलिसांची मोठी कारवाई

शिवसेना कोणाची खटला: शिंदे गटाची नवीन खेळी, शिवसेना अडचणीत

इलेक्ट्रीक वाहणांसाठी येत्या 1 ऑक्टोंबरपासून नवीन नियम; नितीन गडकरींची मोठी घोषणा

‘या’ शेअरमध्ये एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 2.65 कोटी, वाचा सविस्तर माहिती

75 वर्षात कसा बदलला भारतीय नौदलाचा ध्वज, जाणून घ्या सविस्तर माहिती