…म्हणून मी स्वत:च्या पक्षाची स्थापना केली- करूणा मुंडे

अहमदनगर | करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. अहमदनगरमध्ये सभा घेऊन लवकरच त्या पक्षाची स्थापना करणार आहेत. शिवशक्ती सेना (Shiv Shakti Sena) असं नवीन पक्षाचं नाव असल्याचं करुणा शर्मांनी जाहीर केलं.

अहमदनगरमध्ये जानेवारी अखेरीस मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्या संदर्भातली आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली आहे.

करुणा मुंडे यांनी आज नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणं, गोरगरीबांवरील अन्याय दूर करणं या उद्देशाने या पक्षाची स्थापना करण्यात येत आहे, असं करूणा मुंडे यांनी सांगितलं आहे.

गेल्या 25 वर्षांपासून आपण अनेक यातना सहन केल्या आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पक्षात सर्वसामान्य जनतेला स्थान असेल, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

मी हा पक्ष जनतेकडून देणगी गोळा करून सुरू करणार आहे. या पक्षात समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थान असेल. समाजकारण करताना मला सत्तेत असणं गरजेचं वाटलं. त्यामुळे मी स्वतःचा पक्ष स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. घरात आपण राजकारण पाहिलं आहे. पोलिसांचा वापर कसा होतो मी पाहिलं आहे, असंही करूणा मुंडे यांनी सांगितलं आहे.

वेळ पडली तर आपण बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे यांच्याविरुद्धही निवडणूक लढण्यास मागेपुढे पाहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

सध्या तीन पक्षांचं सरकार आहे. फक्त पोलिसांना बळी दिलं जातं आहे. याची उदाहरणे परमवीर सिंह, वानखेडे यांना भोगावं लागलं आहे. समीर वानखेडे सारख्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे, असं करूणा मुंडेंनी सांगितलं आहे.

अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता असल्याचं बोललं जातं, त्यांच्याबद्दल काहीच होत नाही. त्यामुळे आता मी माझं जीवन जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, असं करूणा मुंडे म्हणाल्यात.

महत्वाच्या बातम्या-

रणवीर सिंगने केलं कपिल देव यांना KISS?; सोशल मीडियावर ‘या’ फोटोची एकच चर्चा 

‘मी गुलजार यांच्याकडे टेनिस स्कर्ट मागितला अन् त्यांनी…’; नीना गुप्तांचा खुलासा

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही कशाला रात्रीचे उद्योग करता” 

आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ

शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?