“मी जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल”

मुंबई | धनंजय मुंडेंचे इतरही अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खुलासा करुणा शर्मा पत्रकार परिषदेत केला आहे. तसंच आपण जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल, असं खळबळजनक वक्तव्य करूणा शर्मा यांनी केलं आहे.

करुणा शर्मा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. धनंजय मुंडे हे मंत्री पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांचे देखील संबंध होते. या संबंधामध्ये रेणू शर्मा यांच्या आईचा खून कोणी केला. या विषयी पुरावे रेणू शर्मा देणार होती. ते पुरावे नष्ट करण्यासाठी रेणू शर्माचे सर्व मोबाईल लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पोलिसांनी जप्त केले आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचा धक्कादायक आरोप करूणा शर्मा यांनी केला.

रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करावी आणि सत्य समोर येईल असे करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या विरोधात तक्रार देण्यापूर्वी 9 एप्रिल 20 22 रोजी रेणू शर्मा यांनी एक ट्वीट केलं होतं. धनंजय मुंडे यांचा भांडाफोड करणार असल्याचं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. पण त्याआधीच रेणू शर्माला खंडणीच्या खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

करूणा शर्मांचा मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप, म्हणाल्या… 

व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर! 

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; महापालिकेनं केलं ‘हे’ आवाहन 

केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा 

पुतिन यांच्या मृत्यूच्या अफवेवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा खुलासा!