मुंबई | मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
कोल्हापूर उत्तरमधील (Kolhapur Election) पोटनिवडणुकीत करूणा शर्मा अपक्ष उमेदवार होत्या. एबीपी माझासोबत एक्सक्लुसिव मुलाखत देताना करुणा शर्मा यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
10 तारखेला आचारसंहिता संपली असतानाही काँग्रेस आणि भाजपाने वृत्तपत्रात बातमी तसेच जाहीरात दिल्याचा आरोप करूणा शर्मांनी केला आहे.
यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झालं असून पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पैसे घेताना ताब्यात घेतलं असल्याचं शर्मा यांनी एबीपी माझाच्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत सांगितलं आहे.
या दरम्यान 40 लाख रुपये खर्च केल्याचा आरोप देखील करूणा शर्मा यांनी केला आहे, या प्रकरणी निवडणुक आयोगात तक्रार नोंदवली असूनही त्यावर काहीच कारवाई न घेतल्यामुळे करुणा शर्मा यांनी आक्षेप नोंदवला आहे.
जर निवडणुक रद्द झाली नाही. तर मी न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. माझ्याकडे या प्रकरणी पुरावा आहे, असं त्या म्हणाल्यात.
महत्त्वाच्या बातम्या-
उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल; जयश्री जाधव आघाडीवर
“हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे”
नवरा जेलमध्ये, पत्नीला हवंय मूल; न्यायालयानं दिला मोठा निर्णय
Multibagger penny stock | ‘या’ शेअरचा धुमाकूळ, गुंतवणुकदार मालामाल
“जर कोणी भारताला छेडलं तर त्याला आम्ही सोडणार नाही”