सोलापूर | काही वर्षापूर्वी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करूणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या नात्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं होतं. करूणा शर्मा यांनी या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात उडी घेतली होती.
करुणा शर्मा यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. अशातच करुणा शर्मा यांनी निवडणुकीत उडी घेतली आहे.
करूणा शर्मा यांनी आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतलं. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत बोलताना त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. द कश्मीर फाईल्सवर करूणा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
मोठे नेते देखील या विषयावर बोलताना दिसत आहेत. पण देशामध्ये महागाई, शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा अशा अनेक प्रश्नांवर कोणी बोलत नाही, असं करूणा शर्मा म्हणाल्या.
धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक रांगेत उभे आहेत, असंही त्या म्हणाल्या आहेत. आमच्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण काय आहे?, असं खोचक उत्तर देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.
राजकारण कसं चालतं हे मी गेली 25 वर्षापासून पाहत आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांनी आता कोल्हापूरातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता करूणा शर्मा यांना यश मिळणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तेलंगणात मोठा राडा; कलम 144 लागू
Post Officeची भन्नाट योजना! 10 वर्षांवरील मुलांचं खातं उघडा, दरमहा 2500 रुपये मिळतील
MIMच्या प्रस्तावावर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
भारतात कोरोनाची आणखी एक लाट येणार?; WHO ने दिला भारताला गंभीर इशारा
होळीच्या दिवशी भर रस्त्यात घडली धक्कादायक घटना; पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ